दारूच्या प्रत्येक बाटलीवर आता दहा रुपये ‘गोमाता अधिभार’

हिमाचल सरकारची अर्थसंकल्पात घोषणा , वर्षाला १०० कोटी महसूल मिळणार

दारूच्या प्रत्येक बाटलीवर आता दहा रुपये ‘गोमाता अधिभार’

हिमाचल प्रदेश सरकारने आता दारू विक्रीवर प्रत्येक दारूच्या  प्रत्येक बाटलीमागे दहा रुपये ‘गोमाता अधिभार’ लावण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनीं शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला या अर्हताःसंकल्पामध्ये त्यांनी अनेक चांगल्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. पण या सर्वामध्ये त्यांनी दारूच्या प्रत्येक बाटलीवर खरेदी केल्यावर प्रत्येक बाटलीमागे दहा रुपये गोमाता अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रति बाटली दहा  रुपये  गोमाता अधिभार लावल्यामुळे राज्य सरकारला यामुळे वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हिमाचल प्रदेशममध्ये आता दारू महाग होण्याची चिन्हे आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी या अर्थसंकल्पामुळे राज्याला नवीन दिशा मिळेल. असे अर्थसंकल्प सादर केल्यावर म्हंटले आहे.  या अर्थसंकल्पात बेरोजगारांना व्यवसायासाठी ४० टक्के सबसिडी देण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात ३०,००० कार्यात्मक पदे भरण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. याशिवाय अंगणवाडी सेविकांना नऊ हजार ५०० रुप्ये मानधन तर अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका यांना प्रत्येकी पाच हजार २०० मानधन तर आमदार निधी दोन कोटीवरून दोन पूर्णांक १० कोटी करण्यांत आला आहे.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

आता रोजगार हमी योजनेच्या मजुरांना २५ रुपयांची वाढ करण्यात आली असून आता त्यांची मजुरी ३७५ रुपये असेल. हिमाचल प्रदेशमधल्या २० हजार मुली यांना उच्च शिक्षणासाठी इलेक्ट्रिक स्कुटी खरेदी करण्यासाठी २५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या मुली याचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय चार्जिंग स्टेशनसाठी सुद्धा ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला आहे.

Exit mobile version