30 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरराजकारणपाणी मानवजातीच्या गळ्यापर्यंत आल्याचा इशारा असल्याचे गंभीर चिंतन

पाणी मानवजातीच्या गळ्यापर्यंत आल्याचा इशारा असल्याचे गंभीर चिंतन

Google News Follow

Related

जगामध्ये होत असलेल्या वातावरणीय बदलांचा अभ्यास करून त्याविषयी तटस्थ मत व्यक्त करणाऱ्या ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’चा अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालातून अनेक धोकादायक सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये किनाऱ्यावरील विविध शहरांना असलेला धोका देखील अधोरेखित केला आहे.

या अहवालाला सामनाने देखील मनावर घेतले आहे. सामनामध्ये या विषयावर अग्रलेख छापून आला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्वीटरवरून सामनावर निशाणा साधला आहे. त्यासाठी त्यांनी एकामागोमाग एक दोन ट्वीट्स केले आहेत.

सामनाच्या अग्रलेखामध्ये या अहवालाला गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्याबरोबरच किनारपट्टीवरील शहरे पाण्याखाली जाण्याच्या अहवालातील धोक्याला देखील अधोरेखित करण्यात आले आहे. यानंतर हा अहवाल गांभीर्याने घ्यायला हवा असे देखील या अग्रलेखात म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘अजिबात लाज वाटून घेऊ नका मुख्यमंत्री महोदय, तुम्ही एकदम ब्येष्ट आहात’

बस उत्पादकांना लसीकरणानंतर तेजीची आशा

वड्डेटीवार ‘घोषणाबहाद्दर’

धक्कादायक! संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे भाडे झाले सहापट

यावरून आशिष शेलार यांनी दोन ट्वीट करत सामनाच्या अग्रलेखाचा समाचार घेतला आहे. पहिल्या ट्वीटमध्ये पाणी गळ्यापर्यंत आल्याचा इशारा असल्याचे गंभीर चिंतन केले असल्याचा उल्लेख केला आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात,

इंटरगवर्नमेंटल पैनल ऑन क्लाइमेट चेंज या संस्थेच्या अहवालानुसार ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याची पातळी वाढून देशातील 12 शहरे पाण्याखाली जातील त्यात मुंबईचा पण समावेश राहिल… पाणी मानवजातीच्या गळ्यापर्यंत आल्याचा इशारा असल्याचे गंभीर चिंतन आज दै.सामनाने अग्रलेखात केले आहे.

दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या प्रकल्पाचा देखील उल्लेख केला आहे. हा प्रकल्प मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ट्वीटमध्ये ते म्हणतात,

हा इशारा आताच समजून घ्यायला हवा अन्यथा पाणी नाका तोंडात गेल्याशिवाय राहणार नाही,असा सल्लाही मा.संपादिका महोदयांनी दिलाय. राज्यातील,पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सामना वाचून,विषय समजून घेऊन मुंबईकरांच्या माथी मारण्यात येणारा “समुद्राचे पाणी गोडे” करणाऱ्या प्रकल्पाचा फेर विचार करावा

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा