धीर धरा… पण किती काळ?

धीर धरा… पण किती काळ?

राज्यातील निर्बंध शिथिलीकरणानंतर अजूनही उपाहारगृहांच्या बाबतीत काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे अजूनही विचारविनिमय करण्यातच मग्न असून, केवळ धीर धरा असेच उपाहारगृह तसेच हॉटेल चालकांना सांगत आहेत. कोरोनावाढीचे कारण देऊन पुन्हा एकदा आता उपहारगृहांवर निर्बंधाचा फास तसाच आहे. हॉटेल चालकांच्या बैठकीत ठाकरे यांनी थोडा दम धरा असे म्हटलेले आहे.

राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या ‘आहार’ व हॉटेल ओनर्स असोसिएशन, ‘एनआरएई’ या संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेतली होती. आपल्याला करोनाची तिसरी लाट टाळायची आहे, हे कारण पुढे करत मुख्यमंत्र्यांनी थोडा दम धरा, असे हॉटेलचालकांना सांगितले.

सध्याच्या स्थितीला राज्यातील निर्बंध जाचामुळे उपहारगृहे तसेच हॉटेल व्यवसाय हा चांगलाच संकटात सापडलेला आहे. टाळेबंदीला कंटाळून गेल्या काही दिवसांपूर्वी विरार भागातील एका हॉटेलमध्ये व्यावसायिकाने आत्महत्या केली. ठाकरे सरकारच्या जाचक निर्बंधांमुळे आणि निर्णय न घेण्याच्या क्षमतेमुळे महाराष्ट्रातील जनता आता आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. त्यामुळेच आता हॉटेल व्यावसायिक पूर्णवेळ हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करत आहेत.

हे ही वाचा:
भाजपा-मनसे युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

नीरज चोप्राला बीसीसीआयकडून १ कोटी

केबीसीच्या नावाखाली काय झालं ते वाचा…

आता सहनशक्ती संपली! क्रांतिदिनी होणार आंदोलन

मुंबई शहर आणि उपनगरात याक्षणाला जवळपास ७५ हजार लहानमोठे उपहारगृहे आहेत. यामध्ये कोरोना काळात हलाखीच्या परिस्थितीत ४० टक्के म्हणजेच सुमारे ३० हजार उपहारगृह, धाबे टाळेबंदीच्या निर्बंधामध्ये कायमस्वरूपी बंद पडले आहेत. त्यामुळेच या व्यवसायावर अवलंबून असलेले लाखो बेरोजगार झाले आहेत. जवळपास ३० हजार उपहारगृहातील तीन लाख कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इतकेच नाही तर या उपहारगृहांना मालाचा पुरवठा करणारे उद्योगही डबघाईला आले आहेत.

Exit mobile version