राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीर ठाकरे सरकारने कडक निर्बंधांच्या नावाखाली टाळेबंदी सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. आता त्यात सरकारने किराणा मालाच्या दुकांनांना देखील सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
कुराणातील आयती संबंधात न्यायालयीन लढा व वस्तुस्थिती
भारत सरकारकडून ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ला अर्थसहाय्य
याबाबत बोलताना ठाकरे सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले,
लोक किराणाच्या नावाखाली उगाचच फिरताना आढळले आहेत. लोकांनी निष्कारण फिरणे टाळले पाहिजे. त्यासाठी सकाळी ७ ते ११ या चार तासांसाठी किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. सध्या ३० तारखेपर्यंत संचारबंदी अधिक जास्त कडक करण्याची गरज आहे.
अशा प्रकारचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
यामुळे आता महाराष्ट्रातील किराणा मालाची दुकाने ठराविक वेळेसाठीच उघडी राहणार आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेड्स, यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांतून किराणा मालाच्या दुकांनांना सूट देण्याता आली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेत काही नागरिक उगाचच रस्त्यावर फिरताना आणि गर्दी करताना आढळले होते. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.