22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणबारा ज्योतिर्लिंगांपैकी बाबा बैद्यनाथांच्या दर्शनाला आता जा थेट विमानाने!

बारा ज्योतिर्लिंगांपैकी बाबा बैद्यनाथांच्या दर्शनाला आता जा थेट विमानाने!

Google News Follow

Related

देवघर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधानांनी केले लोकार्पण

झारखंड राज्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध बाबा बैद्यनाथांचे शहर असलेले देवघर. वर्षभर येथे भाविकांची गर्दी होत असते. वास्तविक, आतापर्यंत देवघरला जाण्यासाठी भाविक रस्ते आणि रेल्वे मार्गाचा वापर करत होते, मात्र आता भाविकांना देवघरला जाण्यासाठी थेट विमानाने येथे पोहचता येणार आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा तसेच झारखंडचा ईशान्य भाग आणि आग्नेय बिहारच्या काही जिल्ह्यांना सेवा देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक देवघर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (१२ जुलै ) रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे झारखंडमधील रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळानंतर देवघर विमानतळ हे राज्यातील दुसरे विमानतळ असेल. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीची क्षमता दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची आहे

यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर योजनांचे उद्घाटन केले तसेच पायाभरणी केली.जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले हे आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकांना थेट बाबा बैद्यनाथ धामशी जोडेल. बाबा बैद्यनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. योजनेअंतर्गत कोलकाता, पाटणा आणि रांचीशी जोडलेले देवघर हे ६८ वे विमानतळ आहे. रांचीनंतर झारखंडचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. पंतप्रधान मोदींनी देवघर येथून पहिल्या विमानाला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदींनी २५ मे २०१८ रोजी देवगड विमानतळाची पायाभरणी केली होती. .

सरकार कमतरतांचे संधीमध्ये रूपांतर करत आहे

सरकार कमतरतांचे संधीमध्ये रूपांतर करत आहे. आज बाबा वैद्यनाथ यांच्या आशीर्वादाने १६ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. यामुळे झारखंडच्या आधुनिक कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, आरोग्य, विश्वास आणि पर्यटनाला खूप चालना मिळेल. राज्यांच्या विकासातून देशाचा विकास व्हावा, या विचाराने देश गेली ८ वर्षे काम करत आहे. गेल्या ८ वर्षात झारखंडला महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग याद्वारे जोडण्याच्या प्रयत्नात हीच भावना सर्वोपरि आहे. हे प्रकल्प झारखंडमधून सुरू होत असला तरी बिहार आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांना त्यांचा थेट फायदा होईल. म्हणजेच या प्रकल्पांमुळे पूर्व भारताच्या विकासालाही गती मिळेल.

२०१० मधील स्वप्नाची पंतप्रधानांमुळे पूर्ती

या वेळी बोलताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, या विमानतळाचे स्वप्न २०१० मध्ये पाहिले होते, ते पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कार्यक्रमात सिंधिया यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत झारखंडमध्ये एकूण पाच विमानतळ होणार आहेत. म्हणजे आणखी तीन विमानतळ असतील. बोकारो, जमशेदपूर आणि दुमका येथे हे विमानतळ बांधले जातील. यासोबतच नवीन हवाई मार्ग सुरू करण्यात येणार असून त्यामुळे राज्याशी संपर्क वाढणार आहे.

असे असेल हे अत्याधुनिक विमानतळ
सध्या देवघर विमानतळावरून कोलकात्याला विमानसेवा सुरू होणार असून हळूहळू इथून लोकांना आंतरराष्ट्रीय विमानसेवेची सुविधा मिळू लागेल.
देवघर विमानतळ देशभरातील बैद्यनाथ मंदिराच्या यात्रेकरूंच्या वाहतुकीच्या गरजा देखील पूर्ण करेल.
देवघर विमानतळ क्षेत्रफळ : ६५४ एकर
एअरबस A320 आणि बोईंग 737 विमाने दोन्ही हाताळण्यास सक्षम
धावपट्टी : २,५०० मीटर लांब आणि ४५ मीटर रुंद धावपटी
टर्मिनल इमारत : ४,००० चौरस मीटर
प्रवासी हाताळण्याची क्षमता : ताशी २०० प्रवासी
अन्य सुविधा : एक हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर, दोन एअरबस A320 साठी एप्रन, टॅक्सीवे आणि एक आयसोलेशन
टर्मिनल इमारतीची रचना बैद्यनाथ मंदिराच्या संरचनेवरून प्रेरित आहे आणि त्यात आदिवासी कला, हस्तकला आणि स्थानिक भित्तीचित्रे आणि चित्रे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा