बरखा दत्तने आता थेट तालिबानींची तळी उचलली

बरखा दत्तने आता थेट तालिबानींची तळी उचलली

देशविरोधी बडबडीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पत्रकार बरखा दत्त यांनी आज पुन्हा गरळ ओकलेली आहे. यावेळी त्यांनी तालिबानींच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. त्यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी बरखा दत्त यांच्यावर सडकून टीका देखील केली आहे.

बरखा दत्त यांनी ट्वीट करताना तालिबानला पाठिंबा दर्शवला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी तालिबानच्या क्रुरतेला उठाव तर म्हटले आहेच, परंतु त्यासोबत जगाने या तालिबानी राजवटीला मान्यता द्यावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. काबुलमध्ये रक्तपात न होणे म्हणजे कोणत्याही प्रकारे बळजबरी नसल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

छोटा शकीलच्या भावावर खंडणीचा गुन्हा

‘लसीकरणापूर्वी शाळा सुरू करता येऊ शकतात’

भारताने अफगाणिस्तानातून परत आणले १२९ नागरिक

केंद्रीय मंत्र्यांची आजपासून ‘जन आशीर्वाद’ यात्रा

त्यावर भाजपाचे आक्रमक नेते आमदार अतुल भातखळकर यांनी बरखा दत्त यांना ढोंगी म्हटले आहे. बरखा दत्त यांचा समाचार घेताना अतुल भातखळकर म्हणतात,

बाईंना काल पर्यंत फक्त देशातील जिहादी, नक्षलवाद्यांचा पुळका होता, क्वचित पाकिस्तान, चीनवरही मेहेरनजर व्हायची. आता थेट तालिबानांची तळी उचललेली दिसते. त्यांचे महिलांवर अत्याचार, मुलांचे शोषण, ड्रग्जचा धंदा या क्षुल्लक बाबी. ढोंगी, पाजी…

बरखा दत्त आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,

बळाचा वापर करून सत्तेत आलेल्या तालिबानी सरकारला पाठिंबा न देणाऱ्या १२ देशांत भारताचा समावेश होतो. पण मजेची गोष्ट म्हणजे हे तालिबानी सरकार जरी लोकशाही मार्गाने आले नसले त्यांनी काबूल रक्तपात न करता ताब्यात घेतले आहे, बळजबरीने नव्हे. जगाने ही बाब स्वीकारली पाहिजे.

बरखा दत्त कायमच त्यांच्या देशविरोधी भूमिकांमुळे ट्रोल होत राहिल्या आहेतच शिवाय त्यासाठीच त्या कुप्रसिद्ध आहेत. यापूर्वी देखील त्यांनी देशविरोधाचे प्रदर्शन केलेले आहे. १९९९ मध्ये कारगिल युद्ध चालू असताना या बाईंच्या बेजबाबदार बातमीदारीमुळे पाकिस्तानी सैन्याला भारतीय चौक्यांची माहिती सहजपणे उपलब्ध झाली होती. आता तर थेट त्यांना क्रुर तालिबान्यांचा पुळका आल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

Exit mobile version