ठाकरे सरकारने जे काही झोल झपाटे केलेत ते सांगून टाका

ठाकरे सरकारने जे काही झोल झपाटे केलेत ते सांगून टाका

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे देखील एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. सचिन वाझेची अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या संदर्भात चौकशी चालू असताना ,आता परमबीर सिंह यांची देखील चौकशी केली जाणार आहे.

याबाबत भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, वाझेला परत कुणी घेतलं? सही परमबीर सिंहांची असेल पण मग अशा वेळी गृहमंत्री काय करत होते, मुख्यमंत्री काय करत होते? असा सवाल उपस्थित केला आहे. त्याबरोबरच सरकारला वाझेवर, गृहमंत्र्यांवर कारवाई करायचीच नव्हती असा घणाघाती आरोप देखील केला आहे. चौकशीतून सत्य काय ते समोर येईलच. परमबीर सिंह जर दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील कारवाई करा असेही ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

तात्काळ पावले उचलून छोटे व्यावसायिक, सामान्यांना दिलासा द्यावा

परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल

त्याबरोबरच ट्वीटरवरून देखील त्यांनी सरकारवर आणि परमबीर सिंहांवर निशाणा साधला आहे. “परमबीर सिंह यांना आज NIA ने बोलावले असून ते चौकशीसाठी दाखल झाले आहेत. आता ठाकरे सरकारने जे काही झोल झपाटे केलेत ते सांगा आणि मोकळे व्हा… स्वतःची कर्मही सांगून टाका.” असा टोला त्यांनी लगावला आहे.

अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण, मनसुख हिरेन यांच्या हत्येचे प्रकरण या सगळ्या प्रकरणानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यांवर खंडणीचा आरोप केला होता. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिला होता. त्यानंतर आता खुद्द परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

Exit mobile version