उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने आता लव्ह जिहादसंदर्भात कठोर पावले उचलली असून धर्म परिवर्तन विधेयक आणले आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या गुन्हेगारांच्या शिक्षेचा कालावधी दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात लव्ह जिहादसारख्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्याविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. आता लव्ह जिहादमधील आरोपीला आजन्म कारावासाची सजा सुनावण्याची सूचना करण्यात आली आहे.
लव्ह जिहादबाबत २०१७मध्ये योगी सरकारने कठोर पावले उचलली होती. त्यानंतर यासंदर्भातील गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. या विधेयकानुसार लव्ह जिहाद प्रकरणातील पीडितेला खर्च म्हणून आरोपीला दंड भरावा लागेल.
या नव्या विधेयकात अवैध धर्मांतरणासाठीही कठोर शिक्षा आणि दंड यांच्यात वाढ करण्यात आली आहे. याआधी, लव्ह जिहादबाबत तक्रार करण्यासाठी पीडित व्यक्ती, त्या पीडित व्यक्तीचे आईवडील, बहीण भाऊ हे उपस्थित असणे आवश्यक होते. आता अशा घटनेची तक्रार कुणीही पोलिसांकडे लेखी स्वरूपात देऊ शकतो. त्यानंतर तपास सुरू होईल.
हे ही वाचा:
कोविड काळातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती हटवण्याचे पतंजलीला निर्देश
उबाठा गटाच्या नेत्याचे अचानक निधन झाल्यानंतर अर्नाळ्यातील रिसॉर्टस पाडले!
त्रिपुरा: बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना अटक !
ब्राह्मणांना टार्गेट करून ऐक्य निर्माण होईल?
लव्ह जिहादप्रकरणाचे सर्व खटले आता सत्र न्यायालयापेक्षा खालील न्यायालयात होणार नाही. याअंतर्गत येणारे सगळे गुन्हे हे अजामीनपात्र असतील. याआधी २०२१ला यासंदर्भात नवा कायदा आणला गेला होता. त्यानुसार १० वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा होती. पण आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या अनेक घटना रोज घडत आहेत. त्यात अनेक निष्पाप मुलींचे बळी गेले असून अशा मुलींना लक्ष्य करण्यात आलेले आहे. त्यांना इस्लाम स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याला विरोध केल्यास अशा मुलींच्या हत्या झाल्याचेही समोर येते आहे.