महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू नये यासाठी म्हणून सोमवार, मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावायला सुरुवात केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रक काढून हिंदू नागरिकांना भोंगा प्रकरणी आवाहन केले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मंगळवार, ३ मे रोजी राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.
भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी संपल्यानंतर मंगळवारी राज ठाकरेंनी दोन पानी पत्रक काढले होते. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, अजान वाजल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हणणार. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवत मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना १४९ अंतर्गद नोटीस बजावली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांच्या त्रासाबाबत तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी पत्रकातून केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखलाही त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
भोंगे हटविण्यासाठी एकत्र या, आता नाही तर कधीच नाही!
बुधवार, ४ मे रोजी श्रीमती शैलजा भातखळकर यांची शोकसभा
फरहान अख्तरला ‘तुफान’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
राज ठाकरें विरोधात पोलिसांची उत्तर सभा
त्यापूर्वी रविवार, १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत अटींचे पालन न केल्यामुळे औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला. राज ठाकरे यांच्यावर कलम १३५, ११६ आणि ११७ अंतर्गत आणि इतर कलमांतर्गत राज ठाकरे यांच्यावर करण्यात आला. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी १५३ (अ) अंतर्गतही राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.