उद्धव ठाकरेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेचे भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या १४ आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर १४ आमदारांची तक्रार करण्यात आली आहे.
काल झालेल्या बहुमत चाचणीच्या वेळी या आमदारांनी व्हिपचे पालन केलं नसल्याचा आरोप या १४ आमदारांवर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या १४ आमदारांना आता व्हीपचे पालन न केल्याने नोटीस देण्यात आली आहे. शिवसेनेच्या १५ आमदारांनी बहुमताच्या चाचणी वेळी शिवसेना- भाजपाच्या बाजूने मतदान केलं नाही. या १५ आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश असून भरत गोगावले यांनी तक्रारीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या दिशेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोडले काळे फुगे
विधानसभेत एकनाथ शिंदे यांची तुफान बॅटिंग; भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
कोकणपट्ट्यात पावसाने जोर पकडला, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
शिवसेना वाचविण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही!
दरम्यान, बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे सरकार पास झाले. तर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीतही शिवसेना- भाजपा सरकारने बाजी मारली. भाजपाचे राहुल नार्वेकर यांची निवड झाली. तर बहुमत चाचणीत १६४ मत घेत शिंदे- फडणवीस सरकारने विजय मिळवला.