‘घरीच बसून राहिलात तर काहीच हाेऊ शकत नाही’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

‘घरीच बसून राहिलात तर काहीच हाेऊ शकत नाही’

घरात बसून काही होत नाही. तुमच्या कुंडलीत खूप काही आहे. मात्र तुम्ही घरीच बसून राहिलात तर काहीच हाेऊ शकत नाही असा टाेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसूनच राज्याचा गाडा हाकत हाेते. मंत्रालयातही ते जात नव्हते. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा टाेला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे.

मविआ सरकार अडीच वर्ष सत्तेत हाेते. परंतु या अडीच वर्षांच्या काळात सरकारने काहीही ठाेस कामे केली नसल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार केली जात आहे. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुमच्या कुंडलीत खूप काही. मात्र तुम्ही घरीच बसून राहिलात तर काहीच हाेऊ शकत नाही, अशी सल्लावजा टीका भारतीय जैन महामंडळाने आयाेजित केलेल्या क्षमा याचना कार्यक्रमात बाेलताना केली आहे.

घरात बसून काहीच होत नाही. क्षमा करण्यासाठी मोठे मन हवे. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात. जोपर्यंत कपाळावर भाग्याची रेषा नसते तोपर्यंत काहीच होत नाही. मात्र मेहनतही करावी लागते. अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.

हे ही वाचा:

दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

काेराेना काळात आजारी पडल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते. परंतु त्यानंतर अन्य पक्षांचे नेते मात्र बाहेर पडून काम करत असताना पहायला मिळत हाेतेे. स्वत: शरद पवार यांनीही दाैरे केले. पावसाळ्यामध्ये उद‌्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीची पहाणी करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाैरा केला हाेता. परंतु अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळआत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे मात्र घरातच बसून काम करत हाेते. कार्यकर्ते , पक्षातले नेते यांना भेटून त्यांच्या समस्या साेडवल्या जात नसल्याबद्दलही अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली हाेती. त्यावरूनही बऱ्याच प्रमाणात टीका झाली हाेती. त्याला उत्तर देताना स्वत: उद्धव ठाकरे यांनी घरात बसूनही काम करता येतं असं विधान केलं हाेतं. बरीच टीका झाल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयात आले त्यावेळी मुख्यमंत्री मंत्रालयात आले अशा बातम्याही झाल्या हाेत्या. या सगळ्यारूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा टाेला लागवला आहे.

मुख्यमंत्री छा रहे है

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री आ णि उपमुख्यमंत्री मविआ काळातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी राज्याच्या विविध भागात फिरत असल्याचे बघायला मिळत आहे. कामाचा धडका लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेपर्यंत काम करत असतात यावरूनही विराेधकांनी ‘मग मुख्यमंत्री झाेपतात तरी कधी? अशी टीका केली हाेती. या टीकेला राज्यपाल काेश्यारी यांनी नकळतपणे उत्तर दिलं आहे. क्षमायाचना कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या कामाचे काैतुक करताना राज्यपाल म्हणाले की, आपल्या प्रदेशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काही दिवसच झाले आहेत मात्र ते सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत. मुख्यमंत्री छा रहे है, साथ ही बादल भी छाये जा रहे है अशा शब्दात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कामाची पाेचपावती दिली. राज्यपालांनी मंचावर उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमाेरच त्यांचे या शब्दात काैतुक केलं आहे. पुढे राज्यपाल म्हणाले, आपण सर्व भारतीय आहोत. बौद्ध असो, जैन असो कोणत्याही जातीचा असो सर्वत्र एक गोष्ट अवश्य दिसून येते. ती म्हणजे आपल्याला क्षमा मागणे आणि क्षमा करणे यायला हवं असही राज्यपाल यावेळी म्हणाले.

Exit mobile version