जातीचं राजकारण करत नाही असं रुबाबात सांगणाऱ्या ममता बॅनर्जींवर काल (३० मार्च) त्यांचं ‘गोत्र’ सांगण्याची वेळ आली. काल प्रचार संपल्यानंतर नंदीग्राममधील मतदारांना त्यांचं गोत्र ‘शांडिल्य’ असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडून येण्यासाठी स्वतःचं गोत्र सांगून मतं मिळवण्याचा हा ममता बॅनर्जींचा शेवटचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका या आठ टप्प्यांमध्ये होणार आहेत. काल दुसऱ्या टप्प्याच्या मतदार संघातील प्रचाराचा शेवटचा दिवस होता. ममता बॅनर्जी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, त्या नंदिग्राममध्येही दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे काल नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि अमित शाह या नेत्यांनी प्रचार केला होता. ममता बॅनर्जींविरुद्ध भाजपाचे सुवेंदू अधिकारी हे निवडणूक लढवत आहेत. अधिकारी हे पूर्व मेदिनीपूरमधील मोठे नेते समजले जातात. अनेक वर्ष ममतांची साथ देऊन सुवेंदू अधिकारी हे डिसेंबर २०२० मध्ये भाजपामध्ये गेले होते. तेंव्हापासून ममता आणि अधिकारी यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले. ममता बॅनर्जी या स्वतःचा भवानीपूरचा मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून अधिकारींविरुद्ध निवडणूक लढवायला तयार झाल्या.
हे ही वाचा:
दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांची उपस्थिती कमी व्हायला सुरूवात
राठोड, देशमुख यांच्यानंतर आव्हाडांचा नंबर?
औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द; इम्तियाज जलिल यांच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचा फज्जा
बंगालमध्ये जातीचं राजकारण होत नाही आणि ममता बॅनर्जी या जातीचं राजकारण करत नाहीत असं अनेक वेळा सांगितलं जातं. पण याच ममता बॅनर्जींनी काल प्रचाराच्या शेवटी स्वतःचे गोत्र देखील सांगितले आणि ही अफवा उघडी पाडली.