संत एकनाथ महाराजांच्या वंशजांचा आशीर्वाद घेत एकनाथ शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज

ठाण्यातील कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातून लढणार निवडणूक

संत एकनाथ महाराजांच्या वंशजांचा आशीर्वाद घेत एकनाथ शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज

विधानसभा निवडणूक २०२४ चे बिगुल वाजताच राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांचा मुख्यमंत्र्यांशी सामना होणार आहे. आतापर्यंत चारवेळा ते या विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे निवडून आले आहेत.

उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी भव्य रोड शोमध्ये सहभाग घेतला. यावेळी सजवलेल्या रथासारख्या वाहनात उभे राहून त्यांनी प्रवास केला. यावेळी रस्त्यांवर शेकडो समर्थकांसह नागरिक जमले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी संत एकनाथ महाराजांच्या घराण्यातील योगीराज महाराज गोस्वामी यांचे आशीर्वाद घेतले. आनंद आश्रमातही त्यांनी दिवंगत आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण करून आरती केली.

हे ही वाचा..

मारुतीचे दर्शन घेत अजित पवार, युगेंद्र पवारांनी बारामतीतून केले अर्ज दाखल

ऑस्ट्रेलियात दोन हिंदू मंदिरांची तोडफोड

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशांच्या घरी कार्यक्रमात भाग घ्यायला हरकत नाही!

माहीममध्ये रंगणार तिरंगी लढत; अमित ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

दरम्यान, २९ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार, माहीममधून अमित ठाकरे, कुडाळमधून निलेश राणे, कणकवलीमधून नितेश राणे आदी नेत्यांनीही उमेदवारी अराज दाखल केला.

Exit mobile version