क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबदल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कोणत्याही परिस्थिती कारवाई केली जाईल, त्यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी माहिती उपमख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचे लिखाण करणाऱ्या बद्द्ल ट्विटर कडून माहिती मागितली आहे.
कितीही घाई केली तरी हि माहिती मिळण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. याबद्दलचा पाठपुरावा करून संबंधित व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या जातील, असे फडणवीस म्हणाले. यावर विरोधी पक्षाकडून सभात्याग करण्यात आला.
सभात्याग केल्या नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधक असा प्रश्नच उद्भवत नाही. हे सभागृह एक आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी विरोधकांनी सभात्याग करणे योग्य नाही, याचीही दखल घेतली पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘नवीन नाव पण तेच चेहरे, तीच पापे’
ठिसूळ हाडे, ९० फ्रॅक्चर; पण अहमदाबादच्या तरुणाने घेतली आयआयटीत झेप
टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा उद्योगरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी
इंडिगोच्या विमानात महिलेचा विनयभंग; प्राध्यापकास अटक
प्रश्नोत्तराच्या तासात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहीणार्या वेबसाईटवर बंदी आणून संबंधित लेखकावर करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यावर काय कारवाई केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या संदर्भात सरकार गंभीर आहे.
संबंधित लेख लिहिणाऱ्या आणि ते शेअर करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. ही माहिती ट्विटरकडे पत्र पाठवून मागितली आहे. या बद्दलची माहिती येताच तात्काळ कारवाई केली जाईल.