येडियुरप्पांचे कार्य शब्दात व्यक्त करण्यापेक्षाही मोठे

येडियुरप्पांचे कार्य शब्दात व्यक्त करण्यापेक्षाही मोठे

कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याजागी बसवराज बोम्मई हे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोन्ही नेत्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. “येडियुराप्पांचं योगदान शब्दात सांगता येऊ शकत नाही. त्यांनी अनेक दशकं पक्षासाठी आणि राज्याच्या जनतेसाठी घाम गाळला आहे. त्यांच्या समाजकार्यासाठी ते आजही लोकप्रिय आहेत.” असं ट्विट मोदींनी येडियुरप्पा यांच्यासाठी केलं आहे. मोदींच्या या ट्विटमुळे येडियुरप्पा आणि पक्षश्रेष्ठी यांच्यात मतभेद अशा गेले अनेक दिवस सुरु असलेल्या चर्चेला विराम लागला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यापासून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांना उधाण आले होते. पण मंगळवार, २७ जुलै रोजी या चर्चांना वर पडदा पडला. मंगळवारी संध्याकाळी सात वाजता भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीत मावळते मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी बोम्मई यांना विधिमंडळ पक्षनेता बनवण्यासाठी प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. त्यामुळेच आता बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. बुधवार २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.

हे ही वाचा:

भारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट

शी जिनपिंगची तिबेट भेट हा भारताला इशारा?

देशासाठी मेडल जिंकलं तरच आम्ही भारतीय ठरतो

मोदी सरकार कर्जबुडव्यांविरोधात उचलणार ‘हे’ कठोर पाऊल

बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. बोम्मई यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जनता दल या पक्षापासून झाली. नंतर २००८ साली त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पहिल्यांदा ते सरकारचे जलसंधारण मंत्री म्हणून कामकाज पाहत होते. तर आत्ताही येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्री म्हणून कामकाज पाहिले. ते कर्नाटकातील लिंगायत समाजाचे एक मोठे नेते म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांचे वडील एस.आर बोम्मई हे देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

Exit mobile version