गेले दोन दिवस महाराष्ट्रात त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेवरून हिंसाचार उसळलेला पाहिला मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागात मुस्लीम समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेला दिसला. पण आता त्रिपुरात कोणत्याही मशिदीची तोडफोड किंवा नुकसान झालेच नसल्याची माहिती पुढे येत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे या बाबतचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
शुक्रवार, १२ नोव्हेंबर रोजी त्यांनी राज्यातील अनेक भागात मुस्लिम समाजाने आंदोलनाची आणि जिल्हा बंदची हाक दिली होती. पण या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि जमावाने पोलिसांवर आणि सामान्य दुकानदारांवर दगडफेक केली. या आंदोलनामागचे कारण हे त्रिपुरामध्ये एका मशिदीची झालेली विटंबना असल्याचे सांगण्यात येत होते. पण मुळात त्रिपुरात अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
मिलिंद तेलतुंबडे यमसदनी! गृहमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब
… म्हणून राजधानीत लागणार लॉकडाऊन
निलंबनाच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रका नुसार त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील काकराबन भागातील एका मशिदीचे नुकसान आणि मोडतोड झाल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पण या बातम्या खोट्या असून यात तथ्यांचे पूर्णपणे चुकीचे वर्णन करण्यात आले आहे. काकराबन येथील दर्गाबाजार भागातील मशिदीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही आणि गोमती जिल्ह्यातील त्रिपुरा पोलीस शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहेत असे या पत्रकात म्हटले आहे.
अलीकडच्या काळात त्रिपुरातील कोणत्याही मशिदीच्या संरचनेचे नुकसान झाल्याची नोंद नाही. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये आरोप केल्याप्रमाणे या घटनांमध्ये साधी किंवा गंभीर दुखापत किंवा बलात्कार किंवा मृत्यू झाल्याचे वृत्तदेखील नाही असे देखील गृहमंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या अफवांच्या आधारे हिंसाचार झाला त्या नेमक्या कोणी आणि का पसरवल्या हा प्रश्न उपस्थित झाला आहे.