29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणतौक्तेग्रस्तांच्या तोंडाला ठाकरे सरकारने पुसली पाने

तौक्तेग्रस्तांच्या तोंडाला ठाकरे सरकारने पुसली पाने

Google News Follow

Related

तौक्ते वादळाचा सर्वाधिक फटका हा कोकणवासियांना बसला. कोकणातील फळबागा, शेती यांचे बरेच नुकसान या वादळामुळे झालेले आहे. सिंधुदुर्गातील शेतकरी या वादळामुळे मोडकळीस आलेला आहे. हातात आलेल्या अनेक पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय घरांची पडझड या गोष्टी वेगळ्याच. वादळामुळे भातशेती आणि बागायतीचे फारच मोठे नुकसान झालेले आहे. असे असतानाही ठाकरे सरकारने केवळ १७ कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. कोकणातील जवळपास चार हजार हेक्टर कृषी क्षेत्र वादळामुळे बाधित झालेले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी घेतला अयोध्या विकास प्रकल्पाचा आढावा

बापरे!…छातीतून आरपार गेलेली सळई शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढली

ओबीसींचे राजकीय आरक्षण जाणे हे षडयंत्र

कुंदन, पालांडे यांनी बारमालक, बदल्यांसाठी कोट्यवधी उकळले

राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची सभा झाली यामध्ये ही माहिती देण्यात आली. यावेळी गटनेते रणजित देसाई, संजय देसाई, वर्षा पवार, अनुप्रिती खोचरे आदी उपस्थित होते. तौक्ते वादळामुळे केवळ कृषीक्षेत्रच नाही तर अनेकांचे बरेच नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी वीजेचे खांबही कोसळले. नारळाची झाडे कोलमडून पडल्यामुळे शेतकरी वर्गाला  खूप नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. आंबा बागायतदारही या वादळाच्या तडाख्यात कोलमडला. अनेकांच्या बागा या वादळाच्या तीव्रतेने नष्ट झाल्या. हाताशी आलेले पिक गेल्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः रस्त्यावर आला.

तौक्ते चक्रीवादळात कृषी विभागाकरता केवळ सतरा कोटी शासनाने जाहीर केल्याचे या सभेच्या माध्यमातून सांगण्यात आले. स्थानिकांतर्फे पंचनामे योग्य करण्यात आले नाहीत असा आरोप करण्यात आलेला आहे.

ठाकरे सरकार असे किती व्यवसायांच्या आणि शेतकरी वर्गाच्या मूळावर उठणार आहात. साधी मदतही त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचू शकत नाही हे या सरकारचे अपयश आहे. करोडोंच्या नुकसानील केवळ लाखोंची मदत म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखेच आहे. बळीराजा कोलमडला तर अर्थव्यवस्था कोलमडेल याची तरी किमान जाण ठेवा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा