वारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही

वारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही

आषाढी वारी म्हणजे वारकरी वर्गासाठी आनंदाची पर्वणीच. परंतु या आषाढी वारीवरही आता ठाकरे सरकारमुळे निर्बंधांचे सावट आलेले आहे. त्यामुळेच आता पंढरपूरच्या दिशेने एसटी न सोडण्याचे फर्मानच आता काढण्यात आले आहे. ठाकरे सरकारच्या या जाचक निर्बंधामुळे वारीवर निर्बंध लागू झाले आहेत.

‘विठ्ठलदर्शन नाहीच, एकादशीकाळात पंढरपुरात कुणी येऊच नये, असा फतवा ठाकरे सरकारने काढला आहे. १७ जुलै ते २५ जुलैपर्यंत पंढरपुरात एकही एसटी येणार नाही, अशी अडवणूक केलीय. पंढरीरायाच्या या उत्सवालाच पंढरपूर महाराष्ट्रापासून तोडलं. महाराष्ट्राच्या दैवताच्या सणाला हुकूमशाही बंदीहुकूम निघालाय,’ अशा परखड शब्दांत भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केलेली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने राज्यातील सर्व विभागांना सीमा नाकाबंदी करण्याचे आदेश दिलेले आहेत. २५ जुलै पर्यंत सायंकाळी ४ पर्यंत सर्व जिल्ह्यातील एसटी सेवा पंढरपूरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच आता आंतरराज्य -आंतरजिल्हा नाकाबंदी, पंढरपूर तालुका सीमा नाकाबंदी व शहरात नाकाबंदी आहे. या काळात राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांनी एकही एसटी पंढरपूरसाठी रवाना करू नये. तसेच पंढरपूर येथून आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या सर्व फेऱ्या तातडीने बंद कराव्या, असे आदेश सोलापूरच्या विभाग नियंत्रकाने दिले आहेत.

हे ही वाचा:
‘या’ शिवसेना नेत्यामागेही लागला ईडीचा ससेमिरा

पावसाच्या हाहाकाराने मुंबईत अपघातांची मालिका

श्रावणात यंदाही व्यावसायिकांची वणवण

एसटीचा प्रवास डबघाईस; तोटा ५६०० कोटींवर

पंढरपुरात वर्षाकाठी एक कोटीहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. इथली आर्थिक उलाढालही वारी तसेच भाविकांमुळेच कारणीभूत आहे. वारीच्या निमित्ताने बाजारपेठही फुललेली असते. त्यामुळे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर बहरते. रेल्वे, बसेसच्या उलाढालीसह खासगी वाहतूकदारांचा व्यवसायही तेजीत असतो. पंढरपुरातील निवासस्थाने, हॉटेलची उलाढालही या काळात मजबूत असते. खरंतर ही परंपरा मोडीत निघण्यासाठी सरकारने घातलेले निर्बंध आणि ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा हा कारणीभूत ठरलेला आहे.

Exit mobile version