30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरदेश दुनियाअमेरिकेवरील शटडाऊनचे संकट टळले!

अमेरिकेवरील शटडाऊनचे संकट टळले!

अमेरिकी संसदेची निधी वितरित करण्यास मंजुरी

Google News Follow

Related

अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ने अमेरिकी सरकारला ४५ दिवसांचा निधी वितरित करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या विधेयकाला अखेर मंजुरी दिली आहे. त्यानंतर या विधेयकाला सिनेटमध्येही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेवरील शटडाऊनचे संकट तूर्त तरी टळले आहे. याआधीचे विधेयक फेटाळण्यात आल्यामुळे १ ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन लागू होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

 

अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आणि सिनेट या दोन्ही सभागृहांनी अमेरिकी सरकारच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ४५ दिवसांचा निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेले विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक ३३५ विरुद्ध ९१ मतांनी मंजूर झाले. सिनेटनेही विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे अमेरिकेवरील शटडाऊनचे संकट नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत टळले आहे.

 

हे ही वाचा:

शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध

अमेरिकेमध्ये १ ऑक्टोबरपासून शटडाऊनचे संकट

२५ कोटींच्या लुटीचा कट दिल्लीच्या ठगाने एकट्याने नेला तडीस

विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!

डेमोक्रेटसहित बहुतेक रिपब्लिकन सदस्यांनी निधी वितरित करण्याच्या विधेयकाच्या समर्थनार्थ मत दिले. तर, एक डेमोक्रेट आणि ९० रिपब्लिकन सदस्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला. त्यानंतर विधेयक सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्षाचे बहुमत असणाऱ्या सिनेटमध्ये पाठवण्यात आले. तिथे मध्यरात्रीपूर्वी या विधेयकाच्या समर्थनार्थ ८८ खासदारांनी मत दिले. तर, विरोधात केवळ नऊ मते पडली. या विधेयकामुळे १७ नोव्हेंबरपर्यंत अमेरिकी सरकारला निधीची चणचण भासणार नाही. सिनेटच्या प्रस्तावात रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनला सहा अब्ज डॉलर तर, अमेरिकेतील आपत्कालीन संकटातील निधीसाठी सहा अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे.

 

‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे अध्यक्ष केविन मॅकर्थी यांनी खर्चामध्ये कपात करण्याची मागणी मागे घेतल्यानंतरच हे विधेयक मंजूर होऊ शकले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जर अमेरिकेत १ ऑक्टोबरपासून शटडाऊन लागू झाला असता, तर सर्व अति महत्त्वाच्या सेवा वगळून अन्य सेवा बंद करण्याची वेळ सरकारवर आली असती. अमेरिकी संसदेने सरकारच्या खर्चासाठी अतिरिक्त निधी वितरित करण्याची परवानगी देणारे विधेयक संमत करेपर्यंत अथवा सरकारला अतिरिक्त कर्ज घेण्यास परवानगी न मिळेपर्यंत हा शटडाऊन लागू असता. असे झाले असते तर याचा परिणाम अमेरिकी अर्थव्यवस्थेसह जगभरातील अन्य अर्थव्यवस्थेवरही झाला असता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा