देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन

देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन

देशातील विविध राज्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. महाराष्ट्रातही कोरोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अशावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचं म्हटलंय. सरकार सर्व राज्यांना कोरोना लस उपलब्ध करत असल्याचा दावाही डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.

कोरोना लसीबरोबरच विविध राज्यांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असून, काळाबाजार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी रेमडेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्याची माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिलीय. ज्या सात कंपन्या रेमडेसिव्हीरचं उत्पादन करत होत्या, त्यांनी उप्तादन कमी गेल्यामुळे तुटवडा जाणवत होता. पण या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसंच रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

वाशीमध्ये उपचारादरम्यान तरुणीवर बलात्कार?

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर

राजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही

‘पोयला बौशाख’ निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय)ने रेमडेसिव्हीरचा काळाबाजाराबाबत आलेल्या कोणत्याही तक्रारीवर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. जे लोक मुद्दाम रेमडेसिव्हीरचा तुटवडा निर्माण करत आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी, असंही ते म्हणाले.

Exit mobile version