आम आदमी पक्षानेही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत निवडणूक लढविली मात्र त्यांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार आम आदमी पक्षाला कोणताही ठसा या निवडणुकीत उमटविता आला नाही.
गुजरात निवडणुकीत आप पक्षाने मैदानात उडी घेतली होती आणि तिथे चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही ते काहीतरी कमाल करून दाखवितील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना जबरदस्त फटका या निवडणुकीत बसला. आम आदमी पक्षाला एक टक्का मतेही या तिन्ही राज्यातील निवडणुकात मिळाली नाहीत.
हे ही वाचा:
विधानसभेचे निकाल श्री गांधी-राऊत कृपेकरून
बुद्धिबळ स्टार प्रज्ञानंद आणि वैशालीने केली कमाल!
मुंबई विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात उलगडला सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास
कर्करोगग्रस्त अभिनेता ज्युनियर मेहमूदची जॉन लिव्हरने घेतली भेट
मध्य प्रदेशात त्यांनी २३० जागांपैकी ७० जागी निवडणूक लढविली तर राजस्थानात ते १९९पैकी ८८ जागी निवडणूक लढविली. छत्तीसगडमध्ये ९० जागांपैकी ते ५७ जागी लढले. मात्र एकाही उमेदवाराला निवडणूक जिंकता आली नाही. एवढेच नव्हे तर त्या सगळ्या उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त झाली. आम आदमी पक्षाला छत्तीसगडमध्ये ०.९४ टक्के तर मध्य प्रदेशात ०.४४ टक्के आणि राजस्थानात ०.३८ टक्के मते मिळाली.