राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यावर मंत्री नवाब मलिक यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. योग्य न्यायालयात जामिनासाठी अर्ज करू शकता. या टप्प्यावर हस्तक्षेप करू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
नवाब मालिकांची न्यायालयीन कोठडी २२ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात आहेत. बुधवार, १३ एप्रिल रोजी ईडीने मोठी कारवाई करत नवाब मलिकांची मालमत्ता जप्त केली होती. या कारवाईत नवाब मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर इडीने टाच आणली होती. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडसह आठ मालमत्ता नबाव मलिकांच्या ईडीने जप्त केल्या आहेत.
हे ही वाचा:
CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण
आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
सिग्नलला फडका बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा
सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!
कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना ईडीने अटक केले असून मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. कुर्ल्यातील मोक्याची जमीन कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर एका पत्रकार परिषदेत केला होता.