भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद

मी या गोष्टींवर भाष्य करणार नाही, एवढेच राहुल गांधी यांनी सांगितले.

भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद

७५ व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आहे.आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही, कुटुंबवादावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या वक्त्यव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विचारणा झाली तेव्हा त्यांनी उत्तर न देणे पसंद केले. मी या गोष्टींवर भाष्य करणार नाही, एवढेच राहुल गांधी यांनी सांगितले.

पुढील २५ वर्षाची रूपरेषा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली. तेव्हा भ्रष्टाचार, घराणेशाही या दोन वाईट गोष्टींचा नायनाट करण्यासाठी पंतप्रधानांनी देशातील जनतेला मदत करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा ते घराणेशाही आणि घराणेशाहीबद्दल बोलतात तेव्हा लोकांना वाटते की मी फक्त राजकारणावर बोलत आहे. पण देशात इतर क्षेत्रातही घराणेशाही पाहायला मिळत आहे. राजकारणातही कौटुंबिक राजकारणाने खूप नुकसान केले आहे.

कौटुंबिक राजकारण हे कुटुंबासाठी असते, त्याचा देशाशी काही संबंध नाही. भारतातील सर्व संस्थांच्या शुद्धीकरणासाठी गुणवत्तेच्या जोरावर देशाचा विकास करूया आणि भारताचे राजकारण शुद्ध करूया, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

पुलवामात दोन दहशतवाद्यांना टिपणाऱ्या देवेंद्र प्रताप सिंह यांना कीर्ती चक्र

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही नष्ट करू’

विधान परिषद आमदारकी फुटकळ आहे का ?

देशाचे पाऊल लवकरच ५ जी मोबाईल युगाकडे

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया घेण्यात आली. पण यावेळी राहुल गांधी यांनी माध्यमांना उत्तर देणे टाळले आहे. ते म्हणाले, मी या गोष्टींवर भाष्य करणार नाही. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, एवढीच प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी माध्यमांना दिली आहे.

Exit mobile version