देशाचे गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. महायुतीची बैठकही पार पडली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात बिहार पॅटर्न राबवण्याचा आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्येही तर्कवितर्क लावले जात होते. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना राज्यात बिहार पॅटर्न राबवण्याचा आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार म्हणाले की, अशा कोणत्याही बातमीबद्दल काहीच कल्पना नाही शिवाय अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. अमित शाह हे मुंबईत गणेश दर्शनाला आले असताना त्यांची भेट घेतली होती. पण, या मुद्द्यावर चर्चा झालेली नाही.
सध्या राज्यात कापूस, सोयाबीनचे प्रश्न असून कांदा निर्यात बंदी होऊ द्यायची नाही. तसेच बऱ्याच वर्षांपासून एमएसपीचा दर ठरला नाही, चार-पाच वेळा एफआरपी वाढली पण एमएसपी वाढला नाही हे सगळे प्रश्न त्यांना सांगितले. इतर देखील चर्चा झाली, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :
राहुल गांधींकडून देशाची प्रतिमा मलीन करण्याचे काम !
आंदोलन सोडा, दुर्गापूजेकडे लक्ष द्या…ममतांच्या वक्तव्यामुळे पीडितेच्या आईकडून संताप
७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी उलटवण्याचा कट !
‘मुंबईच्या डबेवाल्या’ची कथा केरळच्या पाठ्यपुस्तकात !
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार का? यावर अजित पवारांनी म्हटलं की, असं काही होणार नाही या सर्व थापा आहेत. सर्व २८८ जागांवर महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्या हे ठरेल. बरचस ठरलय, अजून काही गोष्टी ठरायच्या बाकी आहेत, असं अजित पवार म्हणाले.