सुनील राऊतांना पक्षात घ्यायला कोणी १०० रुपये पण देणार नाही

आमदार नितेश राणेंचा सुनील राऊतांना सणसणीत टोला

सुनील राऊतांना पक्षात घ्यायला कोणी १०० रुपये पण देणार नाही

ठाकरे गटाचे आमदार सुनिल राऊत यांनी आपल्याला आजही १०० कोटींची ऑफर असल्याचा दावा केला होता. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी सुनील राऊत यांना उत्तर दिले आहे.

सुनील राऊत यांना पक्षात घ्यायला कोणी १०० कोटी नाही तर १०० रुपये पण देणार नाही, असा सणसणीत टोला नितेश राणे यांनी सुनील राऊत यांना लगावला आहे. राजाराम राऊत यांची दोन्ही मुलं खोटारडी आहेत. संजय राऊत जेलमध्ये असताना हे सुनील राऊत अमित शाहांच्या कार्यालयाबाहेर आणि भाजप कार्यालयाबाहेर चार चार तास थांबून होते, असेही नितेश राणे म्हणाले. आम्ही भाजपात प्रवेश करतो पण माझ्या भावाला सोडा असे सुनिल राऊत सांगत होते. पण, संजय राऊत आणि सुनील राऊत यांना भाजपा आपल्या पक्षात कधीच घेणार नाही, असेही नितेश राणे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नसते तर ठाकरे कुटुंबीयांनी आतापर्यंत मुंबई विकली असती, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. मुंबईला ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गिळत होती. मुंबई वाचवण्याचे काम मोदी- शाह- फडणवीस यांनी केल्याचे नितेश राणे म्हणाले. लाचार कोण, खोटारडे कोण हे सर्वांना माहीत असल्याचे नितेश राणे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी बांगलादेशी विरोधात पाऊल उचलले होते. याबाबत माझा बाप चोरला अशी भूमिका मांडणारे उद्धव ठाकरे बाळासाहेबांची भूमिका निभावणार का? कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आल्यापासून हिंदूंवर अन्याय वाढल्याचे नितेश राणे म्हणाले. सगळे नेते त्यांना जाब विचारतील का? असे सवाल नितेश राणेंनी उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जी, राहुल गांधींनंतर अरविंद केजरीवाल पंतप्रधान पदाच्या शर्यतीत

भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या

प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर सापडला ऑक्सिजन आणि काही धातू

चीनच्या कुरापती सुरूच; अक्साई चीन परिसरात उभारले जात आहेत बंकर

संजय राऊत यांनी अनेक भाकितं केली आहेत. त्यातील एकही भाकीत खरं झालं नसल्याचे नितेश राणे म्हणाले. संजय अटक होण्याच्या भीतीने बोलत आहेत.

Exit mobile version