तृणमुलला मतदान करणाऱ्यांशिवाय कोणीही बाहेर पडू शकत नाही

तृणमुलला मतदान करणाऱ्यांशिवाय कोणीही बाहेर पडू शकत नाही

तृणमुल काँग्रेस पक्षाचा नेता मुदस्सर हुसैन यांनी नुकतेच विरोधी पक्षांना धमकावतानाचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडियो प्रसिद्ध झाला आहे. मुदस्सर हुसैन यांच्या या वक्तव्यावेळी भांगरचे माजी आमदार अरबूल इस्लाम हे देखील तिथे उपस्थित असल्याचे समजते.

हे ही वाचा:

तृणमूल नेत्याचा राडा…अडवला कोविड लसीचा ट्रक

आज पुदुचेरीत सत्ताबदल होणार?

या व्हिडियोत हुसैन म्हणतात, “तृणमुलला मतदान करणाऱ्यांशिवाय कोणीही मतदानाला बाहेर पडू शकत नाही. ज्यांना तृणमुलला मतदान करायचे नाही ते घरी राहतील. केंद्रीय बल मतदान केंद्राची सुरक्षा पाहत असतील, परंतू आमच्या माणसांसाठी मोकळे रान असेल.”

यावेळी मुदस्सर हुसैन यांनी सांगितले की “वॉर्ड नं. २मध्ये १४,००० मते आहेत आणि आम्हाला ती सर्व हवी आहेत. आम्ही विरोधी पक्ष कोणीही असला तरीही एकत्रितपणे लढून दाखवू. जेव्हा तुम्ही लढता तेव्हा पाठ दाखवून पळून जात नाही. इतर पक्ष याला खेळ म्हणत आहेत. हरकत नाही! हा वेगळा खेळ असेल, ज्यात कोणी विरोधकच नसेल.”

तृणमुल काँग्रेसच्या अंमलात राजकिय हिंसाचार हा काही नवीन नाही. आत्तापर्यंत अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी राजकिय कारणामुळे आपला जीव गमावला आहे.

केंद्रीय सशस्त्र बलाच्या काही तुकड्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बंगालमध्ये पोहोचल्या आहेत. यामध्ये सशस्त्र सीमा बलाच्या ३० कंपन्या, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ६० कंपन्या, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या ५ कंपन्या, सीमा सुरक्षा दलाच्या २५ कंपन्या आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या ५ कंपन्या आहेत.

Exit mobile version