माझे निर्णय घाबरवण्यासाठी नाहीत; तर आमचे लक्ष विकसित भारतावर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य

माझे निर्णय घाबरवण्यासाठी नाहीत; तर आमचे लक्ष विकसित भारतावर!

लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती विरोधक पसरवत आहेत.पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा मी म्हणतो की माझ्याकडे मोठ्या योजना आहेत, तेव्हा कोणीही घाबरू नये. मी कोणाला घाबरवण्यासाठी किंवा फसवण्यासाठी निर्णय घेत नाही, मी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेतो. देशासाठी खूप काही करायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशासाठी मला खूप काही करायचे आहे.कारण माझ्या देशाला किती गरज आहे हे मी पाहतोय, मी प्रत्येक कुटुंबाची स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो, म्हणूनच मी म्हणतो की हा ट्रेलर आहे.मी केलेली कामे ही केवळ मागील १० वर्षातली आहेत.माझ्या कामाची आणि काँग्रेसच्या ५ ते ६ दशकातील कामाची तुलना लोकांनी करावी .२०४७ सालापर्यंत भारत हा विकसीत देश झालेला असेल.”माझे निर्णय कोणाला घाबरवण्यासाठी नाहीत. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. देशासाठी खूप काही करायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

‘आप’ला आणखी एक धक्का, आ. अमानतुल्ला खान यांचा जामीन अर्ज फेटाळला!

मणिपूर:हिंसाचारात लुटलेली शस्त्रे ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ठेवा!

तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “मी गेल्या दोन वर्षांपासून २०४७ वर काम करत आहे. आणि यासाठी मी देशभरातील लोकांकडून मते आणि सूचना मागवल्या आहेत. येत्या २५ वर्षात भारताला कसे पाहायचे आहे, यासाठी मी १५ लाखांहून अधिक लोकांकडून सूचना घेतल्या आहेत.विद्यापीठांशी संपर्क साधला, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधला आणि १५-२० लाख लोकांनी त्यांचे इनपुट दिले आहेत.त्यानुसार काम चालू असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

 

Exit mobile version