शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाही परवानगी मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला होता. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, दसरा मेळाव्याला कोणालाही परवानगी देणार नसल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांच्या अभिप्रायामुळे शिवाजी पार्कवरील मेळाव्याची परवानगी नाकारली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली आहे. गणपती विसर्जनाच्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर मुंबईतील प्रभादेवी येथेही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या पाश्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून प्रशासनाने दसरा मेळाव्याला कुणालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई पालिकेच्या विधी आणि न्याय खात्याचा अहवाल समोर आला आहे. कुणाचा अर्ज अधिकृत हे विधी विभाग ठरवू शकत नसल्याने कोणालाही परवागनी देऊ नये अशी मुंबई महापालिकेची भूमिका आहे.
हे ही वाचा:
तीस्ताला नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द संपवायची होती
तुम्हाला बापाचा पक्ष विकणारी टोळी म्हटले तर चालेल का?
मुंबई विमानतळाने कोरोनानंतर हाताळले विक्रमी १ लाख ३० हजार प्रवासी
गल्लीतले मोदी आणि दिल्लीतले अरविंद सावंत
विधी आणि न्याय विभागाच्या अहवालात खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मेळावा घेण्यासाठी कोणात्या गटाच्या अर्जाला परवानगी द्यायची, हा प्रश्न आहे. दरवर्षी दसरा मेळव्यासाठी शिवसेनेचा अर्ज येतो.परंतु, यावेळी कोणता अर्ज अधिकृत आहे हे विधी विभाग ठरवू शकत नाही. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी कुणालाचा परवानगी देऊ नये, असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.