28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणआरोप बिनबुडाचे! भारतात कोणाचीही हेरगिरी नाही

आरोप बिनबुडाचे! भारतात कोणाचीही हेरगिरी नाही

Google News Follow

Related

देशातल्या सर्वांची खासगी माहिती सुरक्षित

इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगसिस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जगभरातील दहा देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करुन दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी आपले हात बळकट केले आहेत. या दहा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. परंतु  या स्पायवेअरचा गैरवापर होत असल्याचे आरोप भारत सरकारवर करण्यात आले आहेत. भारत सरकारने मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित आहे असंही सरकारने सांगितलं आहे.

ब्रिटनमधील वृत्तपत्र द गार्डीयननं ही बातमी प्रसिद्ध केली होती. गार्डीयननं दावा केल्यानंतर भारत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे की, भारतात एक मजबूत लोकशाही आहे. इथं खाजगी आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान केला जातो. भारतात पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा लागू आहे, त्याअंतर्गत सर्वांची खासगी माहिती सुरक्षित आहे. सरकारनं म्हटलं आहे की, गार्डीयनच्या बातमीमध्ये पुराव्याशिवाय निष्कर्ष काढले गेले आहेत.

हेरगिरीचं हे सॉफ्टवेअर इस्त्राईलमधील सर्विलेंस कंपनी एनएसओने देशांच्या सरकारला विकलं आहे. गार्डीयनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ५० हजारहून अधिक लोकांची हेरगिरी करण्यात येत आहे. यामध्ये अजरबैजान, बहरीन, कझाकिस्तान, मॅक्सिको, मोरक्को, रवांडा, सौदी अरब, हंगरी, भारत आणि संयुक्त अरब अमीरात अशा देशांचा डेटाचा समावेश आहे.

हे ही वाचा:

अमरिंदर विरुद्ध सिद्धू वाद चिघळणार?

शेर बहादुर देउबांवर नेपाळला ‘विश्वास’

येत्या २४-३६ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

उघड्या गटारात पडून ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता

एनएसओ या इस्त्रायली कंपनीने सांगितले आहे की,  हे स्पायवेअर फक्त सरकारी एजन्सीना विकण्यात आलं आहे. त्याचा उद्देश केवळ दहशतवादाविरोधात लढणे हाच आहे. ज्यामुळे जगभरातील हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात मदत होऊ शकते. एनएसओने देखील त्यांचे स्पायवेअर पत्रकारांची हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात येत असल्याच्या बातम्यांना निराधार सांगितले आहे. अशा प्रकारे कोणत्याही पत्रकारांची हेरगिरी होत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा