27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणआता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही

आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही

Google News Follow

Related

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. देशात आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण मोहीमेवर चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोरोनापासून बचावासाठी सूचना मागितल्या आहेत. देशात पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालीय. काही राज्यात चिंताजनक स्थिती असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाने कोरोना संसर्गाची पहिली लाट पार केली. पण दुसरी लाट पहिल्यापेक्षा प्रभावी आहे. सर्वांसाठी हा चिंतेचा विषय आहे. यावेळी देशातील नागरिकही पहिल्यापेक्षा जास्त बिनधास्त बनले आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा युद्ध पातळीवर काम करणं गरजेचं असल्याचं मत पंतप्रधानांनी या बैठकीत मांडलं. कोरोनाला रोखण्यासाठी जनतेच्या भागिदारीसह आपले डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आजही त्याच ऊर्जेने काम करत असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

१४९ जिल्ह्यांमध्ये एकही नवीन कोरोना रुग्ण नाही

एमपीएसी परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मागणी

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरवात

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला रेमडेसिविरचा काळाबाजार

जगभरात रात्रीची संचारबंदी स्वीकारण्यात आलीय. आता आपल्याला हा नाईट कर्फ्यू कोरोना कर्फ्यू म्हणून लक्षात ठेवावा लागेल. त्याचबरोबर कोरोना रोखण्यासाठी आपल्याला मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले. यावेळी आपल्याकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व उपाय उपलब्ध आहेत. आता कोरोना प्रतिबंधक लसही आहे, असं सांगताला लोकांच्या हलगर्जीपणावर मात्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा