त्रिपुरा पोलिसांनी गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी सांगितले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती “पूर्णपणे सामान्य” आहे आणि तेथे कोणत्याही मशिदीला आग लावलेली नाही. तसेच जनतेला अफवा पसरवण्यापासून चेतावनी दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील पानीसागर उपविभागातील चामटिल्ला येथे विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एका मशिदीची कथितपणे तोडफोड केल्याच्या आरोपानंतर, दोन दिवसांनी पोलिसांचे हे विधान आले आहे.
जिल्ह्यात दारूबंदीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. राज्य सरकारने पुढील सूचना मिळेपर्यंत धर्मनगर उपविभागात सीआरपीसी अंतर्गत कलम १४४ लागू केले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुर्गापूजेदरम्यान बांगलादेशात हिंदू समुदायावर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान चामटीला येथील एका मशिदीची आणि अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली.
Tripura Police appeals to all not to spread rumours regarding panisagar incident. Please do not retweet or like the social media post without verification since it amounts to endorsing the view.
Law and Order situation is under control in the state.#Tripura pic.twitter.com/WdOip4fyc1— Tripura Police (@Tripura_Police) October 28, 2021
त्रिपुरा पोलिसांनी एका मशिदीची काही छायाचित्रे ट्विट केली आणि ऑनलाइन प्रसारित होणारी छायाचित्रे बनावट असल्याचे सांगितले. “मशीद सुरक्षित असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ
एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण
“पाणीसागरमधील कालच्या निषेध रॅलीदरम्यान, एकही मशीद जाळली गेली नाही आणि मशीद जाळल्याचे किंवा खराब झालेले चित्र किंवा लाठ्या गोळा करणे इत्यादी सर्व खोट्या बातम्या आहेत.” असे त्रिपुरा पोलिसांनी ट्विट केले.
“काही निहित स्वार्थ त्रिपुराची शांततापूर्ण सांप्रदायिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. (आम्ही) प्रत्येक नागरिकाला विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता राखण्यात आम्हाला मदत करावी.” असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.