विरार येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. त्या हॉटेलात यावरून मोठा राडा झाला होता. तब्बल पाच कोटी रुपये वाटण्यासाठी आणले होते असा आरोप केला जात होता. प्रत्यक्षात ९ लाख रुपये मिळाल्याचा आरोप केला गेला. त्यावरून विरोधकांनी रान उठवले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तावडे यांना क्लिन चीट दिली. त्यांनी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाहीत असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.
ते म्हणाले की, ‘जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो, त्यावेळी जे प्रकार होतात त्यातलाच हा एक प्रकार आहे. विनोद तावडे आमचे, राष्ट्रीय महामंत्री आहेत, ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते, त्यांच्याजवळ कुठलाही पैसा सापडलेला नाही, कुठलीही आक्षेपार्ह वस्तू सापडलेली नाही. उलट त्यांच्यावरच तिथे हल्ला झाला, महाविकास आघाडीचा जी इकोसिस्टम आहे ती कव्हर करण्यासाठी कव्हर फायर केलेला आहे. विनोद तावडे यांनी कुठलेही पैसे वाटले नाहीत, कोणालाही असे पैसे मिळालेले नाहीत’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
बुडत्याला ५ कोटीच्या पुडीचा आधार…
सोमेश टोचतो, सज्जादमुळे गुदगल्या होतात हेच तर परिवर्तन आहे…
मूल्य आणि तत्त्वे कमी झाल्यामुळेच ‘आप’ला सोडचिठ्ठी!
युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन
यावेळी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दलही फडणवीसांना विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, अनिल देशमुख यांनी सातत्यानं जशा हिंदी फिल्ममध्ये सलीम जावेदच्या पटकथा अतिशय पॉप्युलर होत्या, तशाच सलीम जावेदच्या कथा सुरू केल्या आहेत. पोलिसांची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आहे, त्यात सगळं क्लिअर झालेलं आहे. आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की, दहा किलोचा दगड पडला तरी कारची काच का तुटली नाही? एकच दगड गाडीच्या आतमध्ये दिसला, मागची काच फोडून हा दगड आलेला आहे. हा दगड मागून मारलेला आहे तर मागे लागायला पाहिजे होता तो समोर कसा लागला?