लसीकरणासाठी पैसा नाही म्हणणारे सोशल मिडियासाठी सहा कोटी खर्च करतायत

लसीकरणासाठी पैसा नाही म्हणणारे सोशल मिडियासाठी सहा कोटी खर्च करतायत

कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी ६ कोटी रुपये खर्च करायला निघालं आहे, अशा शब्दात भाजपा आमदार राम कदम  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं. अजित पवारांच्या सोशल मीडियावर तब्बल ६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

“कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी ६ कोटी रुपये खर्च करायला निघालं आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी ६ कोटी, तर अशा डझनभर मंत्र्यांसाठी केवढे पैसे खर्च केले जाणार आहेत. लोकांच्या घामाचा पैसा स्वतःची वाहवा करण्यासाठी वापरला जाणारा आहे. या सरकारची प्राथमिकता काय आहे?” असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना संकटामुळे उत्पन्नाचे स्रोत आटून राज्य सरकारला आर्थिक चणचण जाणवत आहे. तिजोरी रिकामी असल्यामुळे गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल ६ कोटी रुपयांचा दौलतजादा खर्च केल्याचं समोर आल्याने टीकेची झोड उठली आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत ‘कडक निर्बंध’

भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस

महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

इस्राएलविरुद्ध इस्लामिक राष्ट्र आक्रमक, ‘ही’ कारवाई करणार

सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केले. या आदेशात अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल. याशिवाय, व्हॉटसएप बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही या कंपनीवर असेल. अजित पवार यांचे सचिव आणि सामान्य माहिती व जनसंपर्क विभागाशी बोलणी झाल्यानंतर या नव्या कंपनीकडे सर्व कारभार दिला जाईल.

Exit mobile version