२३ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे कोरोना नियमांना हरताळ फासून जमलेल्या गर्दीविरोधात पोलिसांनी पाऊले उचलली आहेत. या गर्दी प्रकरणी दहा हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण या दहा हजार जणांमध्ये राज्याचे वनमंत्री संजय राठोड आणि पोहरादेवीचे महंत या दोघांचेही नाव नाहीये.
पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यापासून गायब असलेले महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड हे मंगळवारी सकाळी प्रकट झाले. बंजारा समाजाचे आराध्यदैवत असणाऱ्या पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी संजय राठोड वाशिम जिल्ह्यात पोहोचला. यावेळी राठोड यांच्या समर्थकांकडून कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. राठोड आपल्या कुटुंबियां समवेत अनेक गाड्यांचा ताफा घेऊन पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेला. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात असून देखील हजारो कार्यकर्त्यांनी रठोड यांच्या समर्थनार्थ गर्दी केली. गर्दी अनावर झाल्याने पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.
या संदर्भातच पोलिसांनी दहा हजार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या गर्दीसाठी कारणीभूत ठरलेल्या वनमंत्री संजय राठोडचे नाव त्या दहा हजार जणांमध्ये नाही.
हे ही वाचा:
“आपला माणूस असला तरी कारवाई होणार” – संजय राऊत
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पोहरादेवी प्रकरणात योग्य ती कारवाई होईल असे सांगितले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी येथे उसळलेल्या गर्दीची गांभीर्याने दाखल घेतली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. कुणी आपला असेल तरीही मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार त्यांना सोडणार नाही. जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होईल.” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे