शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते जमणार नाही. प्रसारमाध्यमं आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल, असा दावा भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केला. येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस मुंबईत बसून साऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत, असे गिरीश बापट यांनी सांगितले.
मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. राज्यात भ्रष्टाचार आणि दुराचार वाढला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही. हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, असे गिरीश बापट यांनी संगितले. तसेच कोण कुठे होते यापेक्षा परमबीर सिंह यांच्या आरोपात किती तथ्य आहे, हा मूळ मुद्दा असल्याचे बापट यांनी सांगितले.
हे ही वाचा:
भाजपाची सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार
गृहमंत्र्यांची सीबीआय चौकशी अटळ?
फोन टॅपिंगमुळे उघड झाला पोलिसांच्या बदल्यांचा धंदा
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. यावर गिरीश बापट यांनी भाष्य केले. अरविंद सावंत यांनी सभागृहात असे वागू नये. सभागृहात संसदीय भाषाच वापरली पाहिजे. सभागृहात शिवसेना खासदारांना बोलायला वेळ मिळाला नाही, हा चुकीचा आरोप आहे. विनायक राऊत यांना वेळ मिळाला होता. मात्र, त्यांना दोन तास दिले तरी कमीच आहेत, असा टोलाही बापट यांनी लगावला.