ऑफिसमध्ये १०० टक्के उपस्थिती हवी, पण जायचे बसनेच!

ऑफिसमध्ये १०० टक्के उपस्थिती हवी, पण जायचे बसनेच!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले नियम मंगळवारपासून काही प्रमाणात राज्य सरकारने शिथिल केले. निर्बंध शिथिल करताना सरकारी आणि खाजगी कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीला परवानगी दिली. मुंबई पालिकेने दुकाने रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली. अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाला मुभा आहे, परंतु सामान्य प्रवाश्यांना अजूनही लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळालेली नाही. बेस्ट बससाठी प्रवाश्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात; बसमध्ये उभ्याने प्रवास करण्याची मुभा नसल्याने आसन पकडण्यासाठी प्रवाश्यांची घाई होते तसेच मधल्या थांब्यावरील प्रवाश्यांना बसमध्ये प्रवेशच मिळत नाही. वाहतूक कोंडीमुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.

कर्जत, कसारा, दहिसर येथून मुंबईतील कार्यालयात पोहोचण्यासाठी सामान्य माणसांना कसरत करावी लागत आहे. लोकल वाहतुकीचा पर्याय सामान्यांना नसल्यामुळे दुकानदार, इतर कर्मचारी आणि खाजगी कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात पोहचण्यासाठी बेस्ट बस, टॅक्सी अशा वाहनांचा वापर करत असल्यामुळे रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई शहर व उपनगरात अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत; त्याचाही फटका रस्ते वाहतूक करणाऱ्यांना बसत आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये मुसलमानांनी पुन्हा मंदिर उध्वस्त केले

एसटी महामंडळात अवतरणार भाड्याची बस

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला अमित शहांचा बूस्टर

मोदी सरकारने काँग्रेसची अजून एक चूक सुधारली

सरकारी कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढवल्यामुळे रेल्वे गाड्यांमध्येही गर्दी वाढली आहे. तिकीट मिळवण्यासाठी केवळ तिकीट खिडक्या हा एकमेव पर्याय असल्यामुळे तिकीट खिडक्यांसामोरही लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. मेट्रो प्रवाशांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. राज्यातील निर्बंध शिथिल झाल्याने कामकाज पूर्वपदावर येत असले तरी सामान्य माणसांचे प्रवास हाल मात्र कायम आहेत.

Exit mobile version