विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तिसऱ्यांना पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील पोलादपूर आणि सुतारपाडा भागाची पाहणी केली. या भागात दरड कोसळून मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना सरकारकडून अद्यापही तातडीची मदत मिळाली नसल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. सरकारनं कागदपत्रांची पूर्तता न पाहता पूरग्रस्त आणि दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.
विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, आदींकडून राज्याच्या कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. लोकांकडून वेगवेगळ्या स्वरुपातल्या मदती मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र, पैशांची मदत या नागरिकांना खूप कमी प्रमाणात येत आहे. याबाबत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी दरेकर यांनी केलीय. दरम्यान, सरकारकडून तात्काळ मदत झालेली आहे. धान्याचे किट, रॉकेल, पुनर्वसनाची सोय करण्यात आली आहे. तसंच दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना सरकारकडून तात्काळ ५ लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचा दावा महाडचे उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवार यांनी केला आहे.
हे ही वाचा:
एबी डिव्हिलियर्सवर वंशभेदाचा आरोप का झाला?
राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?
मुंबईतील ‘या’ रुग्णालयात झाली गॅस गळती
नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस
शिवसेना नेते संजय राऊत यांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आल्याने त्यावरून भाजप सरकारवर टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी समाचार घेतला आहे. राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे. प्रविण दरेकर माणगावला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. पुरस्काराचं नाव बदललं म्हणून राऊत टीका करत आहेत. पण त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी किती योजनांची नावं बदलली ते पाहावं, असा चिमटा काढतानाच राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?, असा सवाल दरेकर यांनी केला.