पटोलेंच्या गावात मोदी नावाचा गुंडच नाही!

पटोलेंच्या गावात मोदी नावाचा गुंडच नाही!

आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काहीही बोललो नाही. आपल्या गावात मोदी नावाचा एक गावगुंड आहे, त्याच्याबद्दल बोललो असे विधान करणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता तोंडावर आपटले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील त्यांचे जन्मस्थान असलेल्या सुकळी गावात मोदी नावाचा एकही गुंड नसल्याचे स्थानिकांनीच सांगितले आहे.

टीव्ही ९ च्या पत्रकारांनी या गावाला भेट देत स्थानिकांना अशा कोणत्या मोदी नावाच्या गुंडाची माहिती आहे का, अशी विचारणा केल्यावर असा कोणताही गुंड या गावात नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. गावातील विविध वयोगटातील लोकांना अशा गुंडाची माहिती आहे का, असे विचारल्यावर त्या गावकऱ्यांनी अशा गुंडाची आपल्याला माहिती नाही, असेच सांगितले.

त्यावरून पटोले यांनी आपण मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोलत होतो, हे केलेले वक्तव्य ही शुद्ध थाप असल्याचे स्पष्ट झाले आहे. पटोले यांनी गावात काही लोकांशी संवाद साधताना आपण मोदींना मारू शकतो, शिव्या घालू शकतो, असे विधान केले होते. त्यावरून राज्यभर भाजपाने तीव्र आंदोलने केली आहेत.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये भगवंत मान ठरले ‘आप’ चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

‘नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, बौद्धिक उंची पण हवी’

पटोलेंना अटक करायची सोडून आम्हाला कसली अटक करता!

अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; २६ जणांचा मृत्यू

 

त्यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले होते की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोललो नाही. गावात एक मोदी नावाचा गुंड आहे तो लोकांना त्रास देत होता, त्याची तक्रार लोक करत असल्यामुळे आपण लोकांना आश्वस्त केले. मात्र आता असा कोणताही गुंडच गावात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या वक्तव्याबद्दल पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. पण अद्याप असा कोणताही गुन्हा पटोले यांच्यावर दाखल झालेला नाही. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना तात्काळ अटक केली होती, मग पटोलेंना आता का अटक होत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

Exit mobile version