“रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही”- मोदींचा दीदीला इशारा

“रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही”- मोदींचा दीदीला इशारा

पश्चिम बंगालमध्ये आजपासून मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण २४ परगणा येथील जयनगर येथे सभा झाली. यावेळी त्यांनी ममता दीदींवर घणाघाती हल्ला चढवला.

यावेळी बंगालमध्ये भाजपा नक्की २००च्या पार जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच त्यांनी, पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लोकांनी भाजपाला समर्थन दिले असेही त्यांनी सांगितले. भाषणाला सुरूवात करताना त्यांनी तृणमुल काँग्रेसच्या हल्ल्यानंतर सुमारे महिनाभराने मृत्यु झालेल्या शोवा मजूमदार यांना श्रद्धांजली वाहिली आणि शोवा मजूमदार या बंगालमधील तृणमुलने छळलेल्या माता- भगिनींचा चेहरा असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

तृणमुलने लोकांना प्रचंड त्रास दिला आहे, अत्याचार केले आहेत, बंगालला रक्तलांछित केले आहे असे त्यांनी यावेळी म्हटले. त्याबरोबरच रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

शेतकरी आंदोलक लवकरच संसदेवर मोर्चा आयोजित करणार

सुपररस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

दीदी भाजपाला घाबरली असेही मोदींनी यावेळी सांगितले. भाजपाला असलेल्या समर्थनामुळेच दीदींनी भवानीपूरातून नंदीग्रामला पळ काढला असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी दीदीला श्री रामाच्या नावाचा त्रास आहे, दुर्गेच्या मुर्तींच्या विसर्जनचा आधिपासूनच त्रास होता. आता दीदीला तिलक आणि भगव्या कपड्यांचा त्रास असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच, दीदीचे लोक आता शेंडी असणाऱ्यांना राक्षस म्हणू लागले असा टोलाही त्यांनी लगावला. त्यानंतर, तुम्ही एकवेळ माझा अपमान करा, परंतु मी तुम्हाला बंगालच्या श्रद्धा, रामकृष्ण परमहंस, चैतन्य महाप्रभू यांच्या परंपरांचा अपमान करू देणार नाही असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी ममता दीदींना देशाच्या संविधानाचा अपमान करू नका असेही सुनावले. त्यांनी सांगितले, की अम्फान चक्रीवादळाच्या वेळी, तुम्हाला मदत करण्याऐवजी तुम्हालाच लुटले. केंद्राने पाठवलेली मदत लोकांना देण्याऐवजी तृणमुलच्या कार्यालयात पोहोचती झाली. हाच खेला होबे आहे. असा घणाघाती आघात देखील मोदींनी सभेत केला. त्याबरोबरच त्यांनी सुंदरबनाचा विकास केला नाही अशी टिका देखील ममतांवर केली. यावेळी त्यांनी लेकांना भाजपा सरकार सुंदरबनाचा विकास करेल असा विश्वास देखील दिला. सरकार याठिकाणी कनेक्टिविटी देईल असे ते म्हणाले.

ममता दीदींच्या राज्यात सर्वत्र टक्केवारी आहे असे त्यांनी सांगितले. केंद्राने गरीबांसाठी घरे मंजूर केली आहेत, परंतु कट मनी मुळे घरे होऊ शकली नाहीत असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच बंगालमध्येसुद्धा हर घर जल योजना लागू करू असे त्यांनी सांगितले. तृणमुलमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेही त्यांनी सांगितले.

भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर पी एम किसान सम्मान योजना लागू करू असे आश्वासन देखील त्यांनी दिले. या योजनेअंतर्गत लाभधारकांना त्यांच्या बँक खात्यात थेट ₹१८,००० पाठवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version