शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांकडून त्यावर टीका होऊ लागली आहे. संजय राऊत शिंदे गटावर खालच्या भाषेत टीका करत आहेतच आता उद्धव ठाकरे यांनी आता २०२४ ही लोकसभेची अखेरची निवडणूक ठरेल असे अजब मत व्यक्त केले आहे.
आपल्या जिल्हाप्रमुखांची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, चिन्ह आणि नाव चोरणे हा पूर्वनियोजित कट होता. पण अशी परिस्थिती देशातल्या सगळ्याच पक्षांवर कधी ना कधी येऊ शकते. त्यामुळे ही परिस्थिती थांबवायला हवी. नाहीतर हुकुमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो. २०२४च्या निवडणुकाच आता होणार नाहीत.
हे ही वाचा:
शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार
आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा
रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…
बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!
उद्धव ठाकरे यांच्या मते निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा आहे. ते म्हणतात, केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, आपल्याला तो मान्य नाही. खरे तर निवडणूक आयोगात आयुक्तांची नेमणूक कशी करतात, तिथेही निवडणुकाच व्हायला हव्यात.
उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे शिंदे गटावर टीका केली. त्यांनी आपले चिन्ह आणि नाव ज्यांना मिळाले त्या शिंदे गटालाच चोर ठरवले. त्याविषयी ते म्हणाले की, चोरांना प्रतिष्ठा देण्याचा हा काळ आहे. शिवसेना नाव चोरले असले तरी ठाकरे नाव मात्र चोरता येणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे आदेश, व्हिप वगैरे मानणार नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. मी बाळासाहेब ठाकरे आणि माँ यांच्या पोटी जन्मलो पण ते भाग्य अन्य कुणालाही मिळू शकत नाही.