महाराष्ट्रातील तीनही सत्ताधारी पक्षांमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. तीनही पक्षांतील नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नसून ते फक्त श्रेय लाटण्यासाठी पुढे असतात, असे अनेक घटनांत समोर येत असते. सध्या भारताला विदेशातून मिळालेल्या मदतीपैकी महाराष्ट्राला मिळालेल्या हिश्श्याच्या बाबतीत माविआमधील हा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.
काँग्रेस प्रदेशचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर महाराष्ट्राला परदेशी मदत देण्यास भेदभाव केल्याचा खोडसाळ आरोप केला होता, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या आरोपांना खोटे ठरवले आहे.
हे ही वाचा:
कोविशिल्डच्या दोन डोसेसमधील अंतर वाढणार?
अत्यावश्यक सेवेपलीकडील लोकांना नोंदणीशिवाय लस नाही!
लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब होतोय?……चिंता नसावी!!
शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर
शुक्रवारी (७ मे) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना टोपे म्हणाले की, अमेरिकेकडून भारताला मिळालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनपैकी सर्वात जास्त ५२ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळाले आहेत. दुसरीकडे ‘आरोप सावंत’ या नावाने प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध काँग्रेस नेता सचिन सावंत यांनी सांगितले की, परदेशातून मिळणाऱ्या मदतीतून महाराष्ट्राला कोणताही हिस्सा देण्यात येत नाही.
वारंवार दिसणारा समन्वयाचा अभाव
महाराष्ट्रातील तीनही पक्षांमधील समन्वयाचा अभाव सतत दिसून येतो आहे. परंतु गेल्या काही काळात लॉकडाऊनबाबत मतप्रदर्शन करण्यात तीनही पक्षातील मंत्र्यांमध्ये ज्या प्रकारे अहमहमिका लागली होती त्यामुळे सरकारची बदनामी झाली. गेले काही दिवस मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यातील लॉकडाऊन बाबत मंत्र्यांनी मनमानी वक्तव्ये केली होती. काँग्रेसचे नेता आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी काही तासातच लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली, त्यामुळे मुंबई शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी खरेदीसाठी दुकांनांवर झुंबड केली आणि अनेकांना ताबडतोब गावची वाट धरायला रेल्वे स्थानकावर एकच गर्दी केली. यापूर्वी मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वड्डेटिवार यांनी देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी राज्यातील दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली, तर दुसरीकडे मंत्रीमंडळाची कोणतीही संमती नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या मोफत लसीकरणाबाबतच्या ट्विटवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती.