नार्वेकरांवरील अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची स्वाक्षरीच नाही

महाविकास आघाडीच्या पक्षांमध्येच समन्वय नाही

नार्वेकरांवरील अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची स्वाक्षरीच नाही

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. सभापतींनी सभागृहात बोलू दिले नाही, असा आरोप आमदारांनी केला. मात्र विशेष म्हणजे या प्रस्तावावर अजित पवारांची सही नाही.

यानंतर आता विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर सर्वांचाच विश्वास नाही का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता महाविकास आघाडीत ऐक्याचा अभाव आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नि:पक्षपातीपणे काम करत नाहीये, असा ठराव आणणे ही दुर्दैवाची बाब आहे.

राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. कुठल्याही पक्षाची त्यांनी बाजू घ्यायला नको, नि:पक्षपातीपणे त्यांनी काम केलं पाहिजे पण ते दुर्दैवाने होत नाही असे जाधव म्हणाले. अविश्वास ठरावावर विरोधी पक्ष नेते अजित यावर यांची स्वाक्षरी नाही यासंदर्भात जाधव यांना विचारणा करण्यात आली. 

भास्कर जाधव यांनी संतापातच उत्तर देत चाळीस सदस्यांच्या सह्या असल्याचे जाहीर केले आहे. अविश्वास ठराव चर्चेला जाईल तेव्हा सगळेच बोलतील, बाजू मांडतील असे सांगत भास्कर जाधव यांनी यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या ३९ आमदारांनी २९ डिसेंबरला संध्याकाळी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडला. यासंदर्भात विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र देण्यात आले आहे. मात्र, अजित पवार यांना या प्रस्तावाबाबत काहीही माहिती नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सभापतींविरोधातील या अविश्वास प्रस्तावाची मला कोणतीही माहिती नाही. मला या प्रस्तावाची माहिती असती तर मी त्यावर सही केली असती, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे? 

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. हा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार, आमदार सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी सचिवांना पत्र दिले आहे. या पत्रावर महाविकास आघाडीच्या ३९ आमदारांच्या सह्या आहेत.

Exit mobile version