30 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरक्राईमनामाअनिल देशमुखांना क्लिन चीट दिलेलीच नाही!

अनिल देशमुखांना क्लिन चीट दिलेलीच नाही!

Google News Follow

Related

सीबीआयची अस्सल प्रत मिळाल्याचा इंडिया टुडेचा दावा

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणत्याही प्रकारची क्लिन चीट सीबीआयमार्फत देण्यात आली नाही, हे स्पष्ट करणारा सीबीआयचा अस्सल अहवाल समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘इंडिया टुडे’ने या खऱ्या रिपोर्टची प्रत आपल्याकडे असल्याचा दावा करत प्राथमिक तपासात देशमुखांना क्लिन चीट दिली गेलेली नाही, असे म्हटले आहे.

या पत्रात असे म्हटल्याचा इंडिया टुडेचा दावा आहे की, या संपूर्ण प्रकरणात दखलपात्र गुन्हा झाला असून गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर अज्ञात व्यक्तींनी कर्तव्य बजावताना आपल्या अधिकारांचा गैरफायदा उठविला आणि कर्तव्याशी अप्रमाणिक राहिले.

या पत्रात असेही नमूद आहे की, सचिन वाझेकडे अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या प्रकरणांची जबाबदारी सोपविण्यात आली होती आणि अनिल देशमुख यांना गृहमंत्री म्हणून याची कल्पना होती.

काँग्रेसने मात्र अनिल देशमुख यांना सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने क्लिन चीट दिल्याचा दावा केला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीत अनिल देशमुखांचा हात असल्याचा जो दावा केला होता त्यात देशमुखांचा कोणताही संबंध नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याचा अहवाल दाबण्याचे हे कारस्थान असून याची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

सीबीआयने म्हणे राहुल गांधींना अहवाल पाठवला, पोगो पाहणारेच यावर विश्वास ठेवतील!

अफगाणिस्तानात बँका बंद; सर्वसामान्यांकडे पैशांचा खडखडाट

अभिनेता अरमान कोहलीच्या घरात सापडले ड्रग्स

राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

याआधी, सीबीआयचा हा अहवाल देशमुख यांना क्लिन चीट देत असल्याच्या पोस्ट फिरत होत्या. पण त्या अहवालावर कुणाचीही सही, शिक्का नव्हता. शिवाय, त्या अहवालाची प्रत मोदीविरोधक असलेल्या राहुल गांधींसह अनेक लोकांना पाठविण्यात आल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे देशमुख यांना सीबीआयने क्लिन चीट दिल्याचा गवगवा करून सहानुभूती मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे समोर येते आहे. आता काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामार्फत या क्लिन चीट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करून देशमुखांना अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी कसा विलंब लागेल याचीच काळजी घेतल्याची चर्चा आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा