आसाममध्ये काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यासाठीच राहूल गांधी यांची शिवसागर येथे सभा झाली. त्यासभेत सीएएविषयात राहुल गांधी पुन्हा बरळले आहेत.
हे ही वाचा:
आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की देशात कधीही सीएए लागू होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच लसीकरण मोहिम पूर्ण झाल्यानंतर सीएए लागू करण्याची घोषणा केली होती. त्यावर राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आसाम या सीमाप्रदेशातील राज्यात बांग्लादेशी घुसखोरांची मोठी समस्या आहे. या घुसखोरांमुळे येथील लोकसंख्येचा समतोल बिघडत असून ही देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर बाब आहे. त्यामुळे या घुसखोरांना हुसकावून लावण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने होत असताना देखील ‘या सीएए देशात लागू होऊन देणार नाही.’ अशी राणा भीमदेवी थाटाची गर्जना राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून जोरदार टीका केली आहे.
देशाच्या जनतेने गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेसला विरोधी पक्ष नेता बनू देण्याचाही लायकीची ठेवली नाही पण त्यांच्या डोक्यातून अजूनही आपण सत्ताधारी असल्याचा भ्रम जात नाहीये. राहुल गांधी केंद्र सरकारला देशात CAA लागू न करू देण्याचे न पेलणारे आव्हान देणारे तुम्ही कोण? pic.twitter.com/fx0dOIvWeJ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 14, 2021
सीएए या नागरिकत्त्वाच्या सुधारित कायद्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदु, बौद्ध, इत्यादी धर्मियांना भारतीय नागरिकत्व मिळणे सोपे होणार आहे. मात्र तरीही या कायद्याबबत गैरसमज पसरवून देशात सातत्याने अशांतता पसरवण्याचे प्रयत्न चालू आहेत.