अभिनेत्री केतकी चितळेने आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. शरद पवारांसंदर्भात केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर तब्बल २१ ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले होते, पण आता यासंदर्भात कुठेही तिला अटक केली जाणार नाही. केतकीने राज्यभरात तिच्याविरुद्ध करण्यात आलेले एफआयआर रद्द करण्यात यावे अशी मागणी केली होती, त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले की, तिला आता कोणत्याही एफआयआरसंदर्भात अटक केली जाणार नाही.
याआधी, दोन ठिकाणी जे एफआयआर दाखल होते, त्यात तिला जामीन मिळाला पण हे २१ एफआयआर शिल्लक होते. त्याविरोधात तिने याचिका केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासंदर्भात केतकीने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यावरून तिला अटक करण्यात आली. तब्बस ४० दिवस म्हणजे १४ मे पासून ती कोठडीत होती, त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली. खरे तर, शरद पवारांबाबत ही पोस्ट शेअर करूनही शरद पवारांनी तिच्याविरुद्ध तक्रार केलेली नव्हती तर तिसऱ्याच व्यक्तीने या तक्रारी केलेल्या आहेत. याविषयी केतकीच्या वतीने न्यायालयात आपले म्हणणे मांडले पण तरीही तिला कोठडीतच राहावे लागले.
यावेळी न्यायाधीश नितीन जामदार व एन.आर. बोरकर यांच्या पीठाने हे आदेश दिले की तिला २१ एफआयआरवरून अटक केली जाणार नाही.
हे ही वाचा:
‘बहुमत असेल तरच उपाध्यक्ष निर्णय घेऊ शकतील’
अपात्रास्त्र निकामी, ११ जुलैच्या आत गेम होणार?
“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विजय”
मुडदे येतील… यावरून संजय राऊत लक्ष्य
केतकीने ही पोस्ट केल्यावर राज्यात आंदोलने झाली होती. केतकीला कळंबोली पोलिस स्टेशनमधून नेत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. पण त्यांना अटक करण्यात आली नाही किंवा त्यांच्यावर कारवाईही झाली नाही.