भाजपाला केंद्रात पर्याय म्हणून विरोधक एकत्र आले असून त्यांची दुसरी बैठक बंगळूरू येथे पार पडली. यावेळी या युतीचे नाव युपीए वरून इंडिया असे ठेवण्यात आले. मात्र, या बैठकीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवण्यावर आक्षेप घेतला होता. ‘इंडिया टुडे’ ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नावावर काँग्रेसकडून कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा इंडिया टुडेच्या सूत्रांनी केला असून हे नाव जाहीर होताच नितीशकुमार यांना धक्का बसला. तसेच नितीश कुमार यांनी युतीचे नाव INDIA कसे असू शकते असा बैठकीदरम्यान सवाल केला. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची नितीश कुमार यांची भूमिका महत्त्वाची असून या सर्वात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे त्यामुळे जनता दल (युनाईटेड) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांना धक्का बसला आहे, अशी माहितीही समोर आली आहे.
मंगळवार, १८ जुलै रोजी २६ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बेंगळुरू येथे बैठक घेतली आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरुद्ध लढण्यासाठी ‘इंडिया’च्या नावाची घोषणा केली. यापूर्वी, एनडीए विरोधी गटाला यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) म्हटले जात होते, त्यांनी २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशावर सत्तेत वर्चस्व मिळवले होते.
हे ही वाचा:
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली
देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात
किरीट सोमय्या व्हीडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई सुरू
भारत सर्वाधिक पाच जीडीपी असणाऱ्या देशांच्या पंक्तीत
विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत होणार आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी त्यांनी ३० पक्षांना बोलावलं होतं. ही बैठक दिल्लीत पार पडली.