बिहारचे राजकारण सध्या नीतीशकुमार यांच्या भोवती फिरते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतीशकुमार एनडीएसोबत सरकार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते २८ जानेवारी रोजी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यावरून राजदचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी टीका केली आहे.
‘काल नीतीशकुमार यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र अजूनही ती मिळालेली नाही. त्यांना विचारलेही, आमच्यासाठी वेळ नाहीये का? त्यावर त्यांनी मला आज सांगू, असे उत्तर दिले. नीतीशकुमार इतिहासात कशाप्रकारे नाव नोंदवणार आहेत?,’ असा सवाल शिवानंद यांनी उपस्थित केला. ‘आम्हाला अजूनही विश्वास नाही की, ते इकडे तिकडे जातील. भाजपच्या कार्यालयातील शिपायानेही सांगितले आहे की, त्यांना भाजपमध्ये घेणार नाहीत. नीतीशकुमारांबाबत बिहारच्या भाजप प्रदेशाध्यक्ष काय काय नाही बोलले. तरीही ते त्यांच्यासोबत कसे काय जाऊ शकतात?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
बंगालमधील राहुल गांधी यांच्या यात्रेला परवानगी नाही
सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे
बिहारमध्ये राजकीय पट पालटणार? नितीश कुमार सरकारकडून २२ आयएएस अधिकाऱ्यांची बदली
१६ व्या वर्षी पुस्तक लिहिले; ३० मिनिटांतच संपली पहिली आवृत्ती
तर, तिकडे बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश सिंह यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत, असे स्पष्ट केले आहे. आधीही आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एक आमदार पक्ष सोडून गेला होता. त्यानंतर कोणी गेले का? तर पूर्णिया येथे राहुल गांधी यांच्या होणाऱ्या यात्रेबाबत त्यांना विचारल्यावर नीतीशकुमार यांना यासाठी आमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप आणि नीतीशकुमार यांच्यात करार अंतिम झाल्याचे सांगितले जात आहे. भाजप पुन्हा नीतीशकुमार यांची गळाभेट घेईल, असे बोलले जात आहे. कदाचित विधानसभेचा भंग केला जाईल किंवा नीतीशकुमार यांना पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री केले जाईल.