29 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणनितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

Google News Follow

Related

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच बिहारमध्येही मोठी राजकीय घडामोड घडली. नितीश कुमार यांनी बुधवारी राजभवनामध्ये आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल फागु चौहान यांनी नितीश कुमार यांना शपथ दिली. नितीशकुमार यांच्याबरोबरच राजदचे नेता तेजस्वी यादव यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

बिहारमधील राजकारणाला नाट्यमयरित्या नवे वळण मिळाले. एसजेडी आणि भाजप या दोन्ही पक्षातील वाद शिगेला गेला होता. नितीश कुमार वेगळी मोट बांधणार की भाजपमध्येच राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु मंगळवारी नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाची साथ‌ सोडून राजदच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यानुसार या पाठिंब्याच्या बळावर बुधवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सध्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनीच शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार एका आठवड्यानंतर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शपथविधी समारंभ झाल्यानंतर सर्व पक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांची नावे आणि त्यांना देण्यात येणारी खाती यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी एक ते दोन महिन्यात तरुणांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येईल असे म्हटले आहे.

ही वाचा:

जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?

दहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक

नव्या मंत्रिमंडळात १३ मंत्री

राजकीय तज्ज्ञांच्या मते नव्या नितीश कुमार सरकारमध्ये राजदचे १९ मंत्री, जदयूचे १३ आणि हम पक्षाचा एक मंत्री यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. हम पक्षाचे प्रमुख जतीन राम मांझी यांनी नितीश मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्रीपदे मागितली असल्याचे सांगितले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा