बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, आता एनडीए सोडून इकडे तिकडे जाणार नाही.मंचावरून भाषण देताना नितीश कुमार पंतप्रधान मोदींना म्हणाले की, मी पहिल्यांदा बिहारमध्ये आलो होतो तेव्हा सोबत होतो.त्यानंतर मध्यंतरी आम्ही गायब झालो.आता पुन्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत.आता सोबत राहू, इकडे-तिकडे जाणार नाही.नितीश कुमार या गोष्टी सांगताच मंचावर एकच हशा पिकला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनाही हसू आवरता आले नाही.तसेच लोकसभा निवडणुकीत यावेळी ४००हुन अधिक जागा जिंकू, असे नितीश कुमार म्हणाले.
२० महिन्यानंतर बिहार दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी औरंगबादेत जाहीर सभेला संबोधित केले.पंतप्रधान यांच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाषण केले.यावेळी त्यांनी केंद्राच्या योजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या भाषणात म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये आल्याचा आनंद आहे.आता आपण येत-जात राहू. पंतप्रधान मोदींच्या सभेला लाखो लोकांची उपस्थिती पाहून खूप आनंद वाटत आहे.यावेळी रेल्वेच्या महत्वांच्या योजनांची पायाभरणी, रस्ते बांधणी आणि नमामि गंगेचे उदघाटन होणार आहे.अनेक योजना पंतप्रधान मोदी राबवत आहेत याचा आनंद वाटत आहे.बिहारच्या विकासासाठी हे प्रकल्प अतिशय उपयुक्त असल्याचे नितीश कुमार म्हणाले.या बद्दल पंतप्रधान मोदींचे त्यांनी आभार मानले.
हे ही वाचा:
पुणे: पोलीस अधिकारीच निघाला ड्रग्स तस्कर!
‘नमो महारोजगार मेळावा’ म्हणजे तरुणांच्या हाताला काम देण्याचा उपक्रम
वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर
४ दिवसांत ४०० जेट, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जमले खास सेलिब्रिटी!
आरजेडीवर निशाणा साधत मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, २००५ पूर्वी बिहारमध्ये काय घडत होते ते तुम्हाला माहित आहे.पूर्वी शिक्षणाकडे सर्वांचे दुर्लक्ष होते.कोणी अभ्यास करत न्हवते.आम्ही २००५ पासून भाजसोबत आहोत.बिहार खूप प्रगती करत आहे.सर्वांनी मिळून काम करावे आणि सर्वांनी समृद्ध व्हावे अशी आमची इच्छा आहे.सर्वांची आर्थिक स्थिती सुधारून सर्वजण पुढे जावेत.भविष्यातही पंतप्रधान मोदी बिहारला भेट देतील, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.ते पुढे म्हणाले, जे लोक इकडे-तिकडे करत आहेत, त्याने काहीच फरक पडणार नाही.पंतप्रधान मोदी ४०० जागा जिंकणारच, असा दावा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला.