भाजपविरोधी लढण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ गटाला गेल्या १० दिवसांत पाच धक्के बसले आहेत. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल आणि झारखंड या राज्यांत इंडिया आघाडीला जोरदार धक्के बसले आहेत. या सर्व राज्यांत लोकसभेच्या २००हून अधिक जागा आहेत. त्यामुळे गेल्या १० दिवसांत झालेल्या मोठ्या फेरबदलांमुळे इंडिया आघाडीचे गणित पार बिघडले आहे. त्याचा थेट फायदा भाजपला मिळेल, असे मानले जात आहे.
- पहिला धक्का – तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्याचा थेट परिणाम बंगालमधील ४२ जागांवर होणार आहे.
- दुसरा धक्का – जनता दलाचे नितीशकुमार यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेऊन भाजपसोबत सरकारची स्थापना केली. त्याचा थेट परिणाम बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांवर होणार आहे.
- तिसरा धक्का – झारखंडमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हेमंत सोरेन यांना अटक. झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीचे सरकार तूर्त वाचले असले तरी येथील लोकसभेच्या १४ जागांवर याचा परिणाम होणे निश्चित मानले जात आहे.
- चौथा धक्का – महाराष्ट्र निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी या नावासह पक्षचिन्हही त्यांना देण्यात आले आहे. त्याचा थेट परिणाम लोकसभेच्या ४८ जागांवर होणार आहे.
- पाचवा धक्का – उत्तर प्रदेशात अखिलेश आणि काँग्रेससोबत आघाडीत सहभागी असणारे राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी भाजपसोबत जाऊ शकतात. जर असे झाल्यास त्याचा थेट परिणाम लोकसभेच्या ८० जागांवर होईल.
हे ही वाचा:
हरदा फटाका कारखान्याच्या मालकासह तिघांना अटक
पेपरफुटी आणि बनावट प्रश्नपत्रिकांना रोखणारे विधेयक लोकसभेत मंजूर!